श्री श्रीधर रामचंद्र सागवेकर
अध्यक्ष-विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज, मुंबई)

प्रथम आमचे लाडके नेते गुरुतुल्य जेष्ठ समाजश्रेष्ठी मा. स्व. भार्गवशेठ शंकर सागवेकर, मा. स्व. मोतीरामशेठ लक्ष्मण सागवेकर, मा. स्व. रामचंद्र दा. सागवेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन मानाचा मुजरा.

प्रिय सन्माननीय समाज बंधू-भगिनींना, युवांना-युवतीना व विद्यार्थी मित्रांना माझा मनपूर्वक नमस्कार. सामाजिक एकजूट हि समाजाच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात आहे. त्यासाठी तरी आपण एकत्र यायला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व संस्थांना एकत्र आणण्यासाठीच परिषदेचा विचार पुढे देऊन तो प्रत्यक्ष अमलात आला. महाराष्ट्रातील सर्व संस्थांच्या सहकार्याने 13 व 14 नोव्हेंबर रोजी तिसरी परिषद भांडुप मुंबई येथे घेण्यात आली. समाजकार्याने झपाटलेले सर्व कार्यकर्ते सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊनच ही परिषद यशस्वी होण्यासाठी झटले होते. मुंबई व महाराष्ट्रातील त्या सर्व कार्यकर्त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा. समाजातील चालीरीतीत एकसुत्रीपणा येण्यासाठी समाजाच्या ज्या गंभीर समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी विचारांचीदेवाणघेवाण करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील... संस्थांचे कार्यकर्ते समाज बंधुभगिनी एकत्र येण्यासाठी अशा परिषदांचा कुठे तरी उपयोग होऊन अनेक प्रश्नांना यातून चालना मिळते व अनेक विषयांवर चर्चा होते. तेव्हा अशा परिषद काही अंतराने होणे समाज संघटित होण्याच्या दृष्टिने गरजेचे आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील समाजबांधवांना संघटित करण्यासाठी जिह्यांच्या संस्था स्थापन करण्यासाठी अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस दौरे करुन खूप कष्ट घेतले आहेत. त्यातील काही कार्यकर्त्यांना देवाज्ञा झाली आहे. उर्वरीत कार्यकर्ते आपापल्या परिने सामाजिक बांधिलकीचा वसा घेउढनच काम करत आहेत. अनेक कार्यकर्ते वयाने शारिरीकदृष्ट्या थकलेले आहेत. तेव्हा आता जाणवू लागले की भविष्यातील कार्यभार सांभाळण्यासाठी व सामाजिक समस्या समजावून घेण्यासाठी तरुणांनी पुढे यायला पाहिजे. युवामंच ही युवकांची संघटना गेली अनेक वर्षे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. परंतु मध्यंतरी युवामंचचे कार्य शिथिल होते. काही मोजके कार्यकर्ते थोडाफार प्रयत्न करुन युवामंचाला पुढे आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याच्या प्रयत्नांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. तेव्हा संस्थेच्या कार्यकारी मंडळाने युवामंचची संपूर्ण नव्या संचात निवड करण्याचे ठरविले त्याप्रमाणे पूर्णपणे नवतरुणांची ही युवाकार्यकारीणीची निवड युवामंचाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व युवांना समाजकार्याची आवड आहे. त्यांच्या पाठिशी आपण उभे राहिले पाहीजे. सर्व समाज बंधुभगिनेना विनंती करतो कि समाजाचे भविष्य युवांच्या हाती आहे. त्यासाठीच आपल्या मुलांना व मुलींना युवामंचचे कार्य करण्यासाठी युवामंचला बळकटी देण्यासाठी युवामंचमध्ये सामिल होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ही आपणा सर्वांची सामाजिक बांधिलकी आहे.

Read more

आगामी कार्यक्रम
Card image cap
वास्तू निर्मिती
Card image cap
डोनेशन
Card image cap

संस्था

युवामंच