काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, इर्षा हे सहा विकार माणसाला बाहेरून त्रास देतात व इच्छा माणसाला आतून त्रास देते ह्या सहा विकारांच्या ताब्यात गेलेले मन व शरीर निरोगी राहीलच कसे सहा विकारांवर विजय मिळवणे सोपे नाही पण आपले मन ताब्यात राहिले तर मनावरचा ताण अपोआप हलका होतो.यासाठी करावयाची उपासना
सो. ह: उपासना:-
कृती:- आपल्याला योग्य वाटेल त्या आसनामध्ये शांत बसण्याचा प्रयत्न करा हळू-हळू सर्व लक्ष आपल्या श्वासावर आणण्याचा प्रयत्न करा.आपल्या श्वासाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. श्वास आत येताना सो. व बाहेर पडताना ह: असा ध्वनी एकू येऊ लागतो. आता सर्व लक्ष आपल्या श्वासावर ठेवा. हळू-हळू आपल्या इष्ट दैवत/कुलदैवत यांचे स्मरण करून त्यांच्या दर्शनात स्व:ताला विसरून जाण्याचा प्रयत्न करा. अशा अवस्थेमध्ये काही काळ जाऊ द्या.
आता थोडे सावध होऊन तीन वेळा दीर्घ श्वसन करावे व हळुवार पाने तीन वेळा ओमकार नाद करावे पुन्हा थोडा वेळ शांत बसून पुन्हा थोड्या वेळाने दोन वेळा ओमकार नाद करावा.आता डोळे बंद करून शांत बसावे व जो ओमकार नाद तुम्ही ब्रम्हांडात सोडला आहे तो कानांनी ऐकण्याचा प्रयत्न करा. अशा वेळेस विविध आवाज ऐकू येतात. पण त्यांच्या मागे न जाता केवळ ओमकार नादावर लक्ष केंद्रित करा व नंतर शांत शीतल अवस्थेमध्ये काही काळ बसून रहा दोन्ही हातांचे घर्षण करा. दोन्ही हात संपूर्ण शरीरावर फिरवावे. हळू-हळू एक-एक विकार गळून पडेल. मन निर्मल व शुद्ध होईल व मनावरचा ताण अपोआप हलका होईल. विद्यार्थ्यांनासुद्धा अशा प्रकारची उपासना केल्यास अभ्यासात एकाग्रता साधता येईल.
विशेष सूचना:- पहाटे किंवा सायंकाळी हिरव्या गवता वरून चालावे. झाडांच्या सानिध्यात फिरावे. सात्विक अन्न ग्रहण करावे. आवडीचे संगीत ऐकावे. त्यांच्या तालावर डोलण्याचा प्रयत्न करावा, ज्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे. तो चिंता करीत नाही हे वाक्य विसरू नका. जेव्हा आपल्या ह्रदयातील दिप प्रज्वलित होतो तेव्हा विकारांचा अंधकार नाश पावतो आणि सर्वत्र पसरतो फक्त चैतन्यमय प्रकाश.