आपण पंचाल सुवर्णकार कसे?
संत साहित्यावरील सर्वोत्कृष्ट प्रबंधाला मुंबई विद्यापिठातर्फे दिला जाणारा पुरस्कार ‘सत्वाचा सागर नरहरी सोनार' या प्राध्यपक मंगला सिन्नरकर लिखित ग्रंथाला लाभला आहे. या ग्रंथात पृष्ठक्रमांक 66 वर पंचाल सुवर्णकार संत नामदेवकृत नरहरींची आरती याचा दाखला देऊन नरहरी सोनार ‘पंचाल सोनार‘ होते असे सांगतात.
श्री नामदेवांनी 700 वर्षापूर्वी पंचाल सोनार असा उल्लेख काव्यात केलेला आहे. आजचे नरहरी सोनारांचे जे वंशंज म्हणून सांगितले जातात. ते महामूनी हे विश्वब्रम्ह जातीचे पंचाल सोनार आहेत. पंढरपूर येथील नरहरी मंदिराचे ते पुजारी आहेत.
भारत, संस्कृती, कोश, (संपादक - महादेव शास्त्री जोशी) दहावा खंड पान क्रमांक 142 वर सोनार या शब्दाविषयी दिलेली माहिती - सोन्या चांदिचे दागिने घडविणारे सोनार होत. सोनारात विविध वर्णाचे व धर्माचे लोक येतात. महाराष्ट्र राज्यात याची वस्ती बरीच आहे. सोनार आपली उत्पत्ती विश्वकर्मापासून झाली असे सांगतात. देवांग (दैवज्ञ सोनार) कोकणी ‘ पंचाल सोनार ‘ असे आपल्याला म्हणवून घेतात. पूर्वी महसूल म्हणून गोळा केलेल्या नाण्यांची पारख सोनार करीत असतं. त्यांना पोतदार ही संज्ञा असून त्यांचा बलुतेदारात समावेश होई, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अहिर (खानदेशी) अझर, कडू, विदूर, कानडे, किंवा अंसाळी, लाड, माळवी, वैश्य किंवा जैन असे सोनारात पोटभेद आहेत.