पाचवी व षष्टीपूजन
प्रसूती पासून पाचव्या दिवशी जन्मदानामक देवता(जिवती/जीवन्तिका)पूजा करणे.जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये व त्याला आयुरारोग्य लाभावे या हेतूने शास्त्राने षष्टीपूजन करण्यास सांगितले आहे.बालकाच्या गळ्यात किंवा मनगटात काळ्या दोर्यात सातवीची प्रतिमा ओऊन ती बांधतात.सध्या रुग्णल्यामध्ये बाळंतपण होत असल्याने वरील दोन्ही विधी सोहेरात दहाव्या दिवसापर्यंत सुद्धा करतात.पाचव पूजन कुलाचाराप्रमाणे केले जाते.काहीजण पाचवी सुपामध्ये तर काही पत्यावर पूजतात.(सोबतचे चित्र सुपातील पाचवी पूजनाचे आहे.) सुपात तांदळावर कलश ठेवतात.कलश-तांब्याच्या तांब्या त्यावर हळद-पिंज्राची बोटे ओढणे,कलशात पाणी सुपारी,साव्वारुपया ठेवणे.त्यावर नारळ ठेवणे.त्यावेर्नाराल ठेवणे.ह्या कलशावर केळीच्या पानाची खोर करून चित्रात दाखीवल्याप्रमाणे उभी करून ठेवणे. तिला देवीप्रमाणेसाजीव्ने(कपाळाला कुंकू.काजळाची दोन बोटे म्हन्जेदोन डोळे,नाकाच्या ठिकाणी नथ,गळ्यात एकसर व वेणी घालणे).समोर पानाचे पाच विडे मांडणे प्रत्येक विद्यावर सुपारी,बदाम.खारीक,अक्रोड,हळकुंडा,प्रत्येकी एक एक ठेवणे.तसेच घुगर्या ,उकडीच्या पीठाचे मुटके,पिठाचा दिवा व दक्षिणा ठेवणे.सुपात काळ्या दोरात वेखान्दाचे तुकडे बांधून ठेवणे ,बत्तासे किंवा पेढे प्रत्येक विध्यावर ठेवतात.(देवीजवळ प्रथांना करून घराणे घालून नारळ मानवायाचा असतो.)खातेच्या चार पायाजवळ चार पीठाचे दिवे व एक दिवा मोरीजवळ ठेवतात .उपरोक्त तयारी झाल्यावर भक्ती भावाने देवतेचे पूजन करावे व नेवेद्य दाखवावे .भातावर दही वाढणे ,शेवग्याची भाजी पानावर वाढणे )देवीला दाखवलेला नैवेद्ध सुविनीला द्यावा किंवा गाईला द्यावा कोणाच्या मुखी लागणे चांगले असते,काळ्या दोरयातीलसातवी बाळाच्या गळ्यात किंवा मनगटात बांधावी.
पाट्यावरील पाचवी पूजन
सोबतच्या चित्रात दखीवल्याप्रमाणे पत्यावर वरवंटा ठेवून सात विड्याची पाने देठ खाली करून वरवंट्यला टेकून ठेवावीत .पानाच्या टोकांना शेंदूर लावतात.काजळाची दोन बोटे प्रत्येक पणाला दोन डोळे म्हणून लावतात,(सत्पमात्रुका पूजन)नद्यामध्ये सोन्याची सातवी ओवून ती देवतेच्या गळ्यात घालावी.वेणी घालावी,समोर पीठाचे सात दिवे व पाटयाच्या चार कोपरयाना चार पीठाचे दिवे लावतात.प्राचीन परंपरेची जपणूक करणारा दगडी दिवा पाट्याच्या मध्यभागी लावतात..(पणती हि चालते)पाट्यासभोवती रांगोळी घालावी.अशा रीतीने तयारी झाल्यावर भक्तिभावाने देवतेंचेपूजन करावे व नैवैद्य दाखवावा.(नैवैद्य-ताटात मुदभात,भातावर दही,भातासाभोवती पाच उकडी मुटके व काळी मिरी पूड)हि पाट्यावरील पाचवी व षष्टी म्हणून दोन दिवस पूजतात.
षष्टी पूजनासाठी
पाचवी पूजनाचे दुसरे दिवशी ज्या ठिकाणी पाचवी पूजन केलेले असते.त्याच ठिकाणी एक पाट ठेवतात.पाटावर एक नारळ,कोरा कागद,लेखणी,(मुलगा असेल तर हातोडा व मुलगी असेल तर कोयती)असे एक शस्त्रही ठेवतात.व त्यांचे पूजन करतात.
नामकरण
मुल जन्माला आल्यावर मुलाचे बाराव्या दिवशी व मुलीचे तेराव्या दिवशी नामकरण विधी व कान टोचणे हा विधी करावा असे शास्त्र सांगते.नामकरण या नावाचा संस्कार राहिलेला नसून बहुतेक ठिकाणी तो समारंभ किंवा सोहळा म्हणूनच संपन्न होतो.त्या वेळेस नवजात बालकास पाळण्यात घालतात त्यालाच बरसे म्हणतात.
चित्रात दाखीवल्याप्रमाणे देवाजवळ पानाचा विडा,पाळण्याच्या चार पायांशी चार दिवे,पानाचे चार विडे तसेच मध्यभागी पानाचा विडा व दिवा ठेवणे(पानाचा विडा-पानावर सुपारी हळद,कुंकू वहाने,एक पेढा,उकडलेले चणे(घुगर्या)व पैसे ठेवणे.पाळण्याखालीपाच प्रकारचे धान्य वाटीत भरून ती वाटी पाळण्याखाली ठेवणे,बलाचा नाल पडतो तो नालव वाटीतले धान्य संध्याकाळी मातीत पुरून टाकतात.(घरातील सुहासिन बाई गेली असल्यास तिच्या नावाने विद्याच्या पानावर हळद,कुंकू व फुल वाहून पान तुळशीजवळ ठेवावे) मोरीजवळही पानाचा विडा व दिवा ठेवणे, पाळण्याला हळद कुंकू लावणे. ५ ओट्या भरणे ( माहेरची सासरची नंतर तीन).
गोपा खेळवणे
चंदनाचे खोड किंवा वरवंटा यास बाळाला गुंडाळण्याचे फडक्याने गुंडाळावे त्याला टोपरे घालावे त्याला गोपा म्हणतात. हा गोपा 'कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या' असे म्हणत गोपा खेळवायचा असतो पाळण्यात घालण्यापूर्वी बाळालाही शक्य असेल तर खेळवतात. नंतर मुलाची आत्या / मावशी मुलाचे नाव कानात सांगते.
नामकरण विधी
एका ताम्हणात तांदूळ घेवून त्यावर सोन्याच्या अंगठीने प्रथम गणेश, इष्टदेवता कुलदेवता,ग्रामदेवता यांची नावे लिहिणे पाचवे नाव बालकाचे लिहून त्या ताम्हणाची पंचोपचार पूजा करावी. ते नाव बालकाच्या उजव्या कानात तीनदा सांगणे व नंतर भद्रं कर्णेभि: असे म्हणावे. (जन्मनक्षत्रावरून, राशीपरत्वे मुलाचे नावराशी नाव किंवा व्यावहारिक नाव ठेवतात )
निष्क्रमण संस्कार
साधारण महिनाभराने बाळाला घराबाहेर, देवळात नेणे.
अन्न प्राशन
उष्ठावण करण्यासाठी प्रतिपदा पौर्णिमा अष्टमी द्वादशी या तिथी वर्ज्य समजाव्यात. मुळ सात-आठ महिन्याचे झाले की त्याला तांदळाची ( तांदळाच्या रव्याची) खीर पाजतात. हळूहळू नरम भात भरवतात. त्यालाच उष्ठावण अथवा अन्न प्राशनकरणे म्हणतात.
जावळ काढणे
हा संस्कार मुलगा व मुलगी दोघांवर होणे आवश्यक आहे. कारण मूल गर्भात असताना वाढलेले वसा (चरबी ) युक्त केस आरोग्यदृष्ट्या उपकारक नसतात. जन्मापासून एक वर्षाचे आत जावळ काढले जाते, किंवा तीन वर्षापर्यंत केव्हाही सममासात योग्य दिवस पाहून जावळ काढावे मुलाची ताळू(टाळू) भरण्यासाठी तेल वापरतो तेलामुळे डोक्याला खवडा होण्याची भीती असते तेव्हा जन्मवेळचे केस काढणे महत्वाचे असते त्यामुळे डोक्यावर जावळ असेल तर ते निघून जाते, नवीन केसांचे नूतन केसांचे उगवण घट्ट व जोमदारपणे होते.
वाढदिवस
ज्याचा वाढदिवस साजरा करावयाचा आहे त्याला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा वाढदिवस साजरा करण्याचा हेतू आहे. पाश्शात्य पद्धतीनुसार केकवर मेणबत्त्या लावून त्या फुंकणे, हैप्पी बर्थ टू यु ,(हा जन्मदिवस तुला सुखाचा जावो ) असे टाळ्या वाजवीत म्हणणे या पद्धतीत आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची इच्छा व्यक्त होत नाही . तसेच मेणबत्त्या विझवून आपणाला अंधाराकडे जायचे नाही तर अंधाराकडून प्रकाशाकडे जायचे आहे. ' तमसो मां ज्योतिर्गमय' असे शास्त्र सांगते. म्हणून आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करणे, आपणा सर्वांच्या हिताचे कल्याणाचे आहे.
औक्षण करणे
वाढदिवसाचे दिवशी मुलाला अभ्यंग स्नान घालावे. नवीन कपडे परिधान करावेत रांगोळी काढून पाट मांडावा. पाटावर मुलाला बसवावे व घरातील जैष्ट स्त्रियांनी ओवाळावे. मुलाने जैष्टाना नम्रतेने नमस्कार करावा. जैष्टांनी मुलाला दीर्घायुष्याचा ......आयुरारोग्य प्राप्त होण्यासाठी प्रेमपूर्ण आशीर्वाद द्यावा . वाढदिवसाचे दिनी सूर्याला नमस्कार घालून उत्तम ते खालील मंत्र म्हणून मुलाला खाण्यास सांगावे.
सतिल गुड संमिश्र अन्जल्यर्धमित पय:|
मार्कडेयात वरलब्ध्वा पिबाम्यायुर्विवृद्धये||
अशा रीतीने उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी.
दीर्घायुष्यासाठी अश्वत्थामा, बली,व्यास, हनुमान, बिभीषण,कृपाचार्य परशुराम हे सात व मार्कडेय असे आठ चिरंजीव सांगितले आहेत. आजही ते जीवित आहेत. अशा चिरंजीवांची प्रार्थना करून अपमृत्यू येवू नये अशी मागणी करावी.
प्रार्थना
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानाश्च बिभीशन: |
कृप: परशुरामश्च सप्तैते चीरजीविनी: ||
सप्तैतान संस्म्रेन्नित्य मार्कान्देयाम्ठास्तामम |
जीवेत वर्षशतं साग्रं अपमृत्यु विवर्जित : ||
असा हा विधी करून नंतर हौस मौज म्हणून आपापल्या शक्तीनुसार समारंभ साजरा करावा.