विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संचालित युवामंचचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु आहे.’वृक्षवल्ली आम्हा सोयरी“ म्हणजे झाड आपले मित्र. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. म्हणूनच ’वृक्षारोपण“ उपक्रम युवामंचकडून राबविण्यात आला. सदर ’वृक्षारोपण“ उपक्रम भिवपुरी-कर्जत येथे चिंचवली ग्रामपंचायत येथील जागेत 23 जुलै 2022 रोजी ’वनसंवर्धन दिन“ या निमित्ताने करण्यात आला. यावेळी एकूण 50 झाडांचे वृक्षारोपण चिंचवली - गणेशघाट येथे करण्यात आले. तसेच सामाजिक कर्त्यव्य म्हणून चिंचवली ग्रामपंचायत येथील आदिवासी पाड्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा एकसल या शाळेतील पहिली ते चवथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. वृक्षारोपणासाठी लागणारी 50 झाडे युवामंच सरचिटणीस अतुल रामचंद्र देवरुखकर यांनी मुंबई महानगरपालिका यांच्या सहयोगाने मोफत मिळवली. तसेच वृक्षारोपणासाठी लागणारी जागा मिळविण्यासाठी संस्थचे उपाध्यक्ष सुनील भार्गव सागवेकर यांनी सहकार्य केले तसेच स्वतच्या सागवेकर फार्महाऊसमध्ये सर्वांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था उत्तमरीत्या करण्याकरता खूप धावपळ केली, काही कमी पडू दिले नाही त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तर विद्यार्थ्यांना वह्या वाटपासाठी सदानंद दत्तात्रय नगरकर, संजय सखाराम देवरुखकर, आत्माराम रामचंद्र देवरुखकर, मोहन हरिश्चंद्र नगरकर देणगीदार लाभले. सदर कार्यक्रम करण्यासाठी युवामंच सल्लागार व पतपेढी उपाध्यक्ष श्री योगेश हरिश्चंद्र सागवेकर यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वृक्षसवर्धनासाठी संजय सखाराम देवरुखकर, योगेश हरिश्चंद्र सागवेकर, प्रकाश अनंत वाडेकर, अतुल रामचंद्र देवरुखकर, गणेश दत्तात्रय सागवेकर, संदीप विलास वाडेकर आणि रामचंद्र रघुनाथ पालकर यांनी देणगी दिली या सर्वाचे युवामंच कडून जाहीर आभार!
सदर कार्यक्रम राबविण्यासाठी श्री. राजेश भगत (कर्जत तालुका - भारतीय जनता पार्टी) साहेबांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच चिंचवली ग्रामपंचायत माजी सरपंच ऋषिकेश भगत साहेब, सरपंच सौ. सुनिता मंगेश अहिर, उपसरपंच सौ. स्वाती चिंतामण बोराडे, ग्रामसेवक सुरज मुकादम यांचे विशेष सहकार्य लाभले तर या उपक्रमाच्या पूर्व तयारी करीता श्री ऋषीकेश भगत यांनी व त्यांच्या सहकाऱयांनी महत्त्वाचे योगदान दिले. सदर कार्यक्रमासाठी विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई अध्यक्ष श्रीधर रामचंद्र सागवेकर, सरचिटणीस मोहन हरिश्चंद्र नगरकर, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार महासंघ सरचिटणीस सदानंद दत्तात्रय नगरकर, संस्थेचे उपाध्यक्ष उदय रामचंद्र सागवेकर, उपाध्यक्ष सुनील भार्गव सागवेकर, सहचिटणीस अशोक रघुनाथ पालकर, माजी अध्यक्ष विलास विठोबा वाडेकर, माजी अध्यक्ष आत्माराम रामचंद्र देवरुखकर, विश्वकर्मा सुवर्णकार सहकारी पतपेढी (मर्या.) चे अध्यक्ष मनोहर लक्ष्मण पालकर, युवामंच अध्यक्ष गणेश दत्तात्रय सागवेकर, सरचिटणीस अतुल रामचंद्र देवरुखकर, सहचिटणीस संकेत सदानंद नगरकर, कार्याध्यक्ष श्री प्रसाद गजानन चिखलकर व श्री मंगेश रमेश पालकर, खजिनदार ओंमकार सुरेश सागवेकर व उपखजिनदार श्री आशिष अशोक पालकर व अजय आगवेकर, युवामंच माजी उपाध्यक्ष सुरेश सागवेकर, माजी सदस्य अजय ना. पालकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महिला संघटना सल्लागार सौ. वैशाली विलास करंजवकर, श्रीमती अनिता प्रमोद सागवेकर, श्रीमती रुची रविंद्र सागवेकर, कु. रत्नावली वासुदेव चिखलकर उपस्थित होत्या. संस्थेची संलग्न शाखा दिवा-डोंबिवली ते कर्जत- कसारा विभाग कार्यकर्ते संतोष दत्ताराम देवरुखकर, शैलेश काशिनाथ पंडित, शरद बाळाराम पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी 6 वाजता प्रवास सुरु झाला सर्वांना घेत घेत बस वृक्षारोपण कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचली. सर्वांनी सहलीप्रमाणे मजा-मस्ती-धमाल करत प्रवासाचा आनंद लुटला. आज सर्वाच्या चेहऱयावर वेगळाच आंनंद दिसत होता. प्रथम कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे संस्थेच्या अध्यक्षांच्या वतीने श्री गणेश, संत नरहरी सोनार, विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. सर्वांनी प्रतिमांचे पूजन केले. युवामंच सरचिटणीस अतुल देवरुखकर यांनी विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संस्था पदाधिकारी, युवामंच, पतपेढी, महिला संघटना, विश्वकर्मा पंचाल, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य या सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. युवामंच अध्यक्ष गणेश दत्तात्रय सागवेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली यावेळी युवामंचचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु आहे यानिमित्ताने युवामंच कडून वृक्षारोपण व आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रमांनी सुरुवात झाली आहे याचा आनंद होत आहे. या वृक्षारोपण उपक्रमामुळे उत्तम पर्यावरण राखण्यासाठी आपल्याकडून हातभार लागला. शैषणिक उपक्रमाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले आज हि मुलं यातून प्रेरणा घेतील व आपले जीवन सुखकर बनवतील अशी आशा आहे. असे समाजाबाहेर जाऊन उपक्रम करणे आवश्यक आहे यामुळे संस्थेची समाजाबाहेर ओळख व नाव होते. याचा फायदा संस्थेला पुढील वाटचालीस नक्कीच होऊ शकतो असे वाटते. संस्थने तसेच चिंचवली ग्रामपंचायत यांनी हे उपक्रम करण्यास युवामंचला परवानगी दिली याबद्दल आभार व्यक्त केले.
यानंतर मनोगतात महासंघ सरचिटणीस सदानंद दत्तात्रय नगरकर यांनी युवामंचचे व ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्यांचे अभिनंदन केले. आज युवामंचच्या माध्यमातून रोप्यमहोत्सव सुरु आहे यामध्ये विविध कार्यक्रम युवामंच राबविणार आहे. वृक्षारोपण व आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप ह्या उपक्रमांनी याची सुरुवात झाली. आजची पर्यावरणीय स्थिती पाहता ती ठीक नाही आहे याची झळ प्रत्येक मानवाला होत आहे, हि परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तसेच आपण प्रगतीकडे जात असताना समाजातील इतर वंचित घटकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते युवामंच आणि संथेच्या माध्यमातून साध्य होत आहे हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. असे बोलून युवामंच च्या पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्थेचे उपाध्यक्ष उदय रामचंद्र सागवेकर यांनी आज एक झाड किती महत्वाचे आहे हे सांगितले आज जे ग्लोबल वार्मिंग होत आहे पावसाची अनिश्चितता यामुळे पर्यावरण बिघडत आहे. पर्यावरण सुधारण्यासाठी आपण जो प्रयत्न करत आहोत हे उत्तम कार्य आहे, असे काम आपल्याकडून सतत होत राहिले पाहिजे युवामंच आणि उपस्थित सर्वाचे आभार मानले. कार्यक्रमावेळी हेमंत खाडिलकर यांनी सेंद्रिय खताविषयी उपयुक्त माहिती दिली. सेंद्रिय खताचा वापर कसा करावा यामुळे शेतकऱयाला जास्तीचा आर्थिक फायदा कसा होतो याबद्दल सांगितले. वृक्षारोपण व आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ लोकांनी कार्यक्रमाचे खूप कौतुक केले आणि भविष्यात संस्थेला असे उपक्रम करायचे असल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उपक्रम राबविल्याबद्दल युवामंच चे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष श्रीधर रामचंद्र सागवेकर यांनी अध्यक्षीय मनोगतात युवामंचचे अभिनंदन केले. वृक्षारोपण व आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रम केल्यामुळे संस्थेचे नाव समाजाबाहेर मोठे होत आहे हे कौतुकास्पद आहे असेच कार्यक्रम याहीपुढे राबवावेत यासाठी संस्थेकडून जे सहकार्य लाभेल ते अवश्य करू. तसेच चिंचवली ग्रामपंचायतीने जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. यानंतर दुपारचे 1ः30 वाजता वृक्षारोपण करावयाच्या जागी सर्वांनी प्रस्थान केले. दुपारचे 1ः30 वाजले होते पण कोणालाही जेवणाची चिंता नव्हती. प्रथम संस्थेचे अध्यक्ष श्रीधर रामचंद्र सागवेकर व महासंघ सरचिटणीस सदानंद दत्तात्रय नगरकर यांच्या वातीने वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर संस्थेचे पदाधिकारी, पतपेढी, विश्वकर्मा पंचाल, युवामंच, महिला संघटना पदाधिकारी कार्यकर्ते, सभासद यांनी अनुक्रमे वृक्षारोपण केले. यावेळी सर्वांच्या चेह्रयावर एक वेगळेच समाधान पहावयास मिळाले. प्रत्येकजण आपल्यापरीने वृक्षारोपण करण्याचा आनंद घेत होता. एकमेकांना सहाय्य करीत होता. अशाप्रकारे सर्वांनी एकजुटीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर आदिवासी पाड्यात जाऊन विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तेथील विद्यार्थ्यांच्या वह्या मिळाल्याचा आनंद बघण्यासारखा होता यातून एक वेगळे समाधान मिळाले. यासाठी युवामंच सर्वांचा ऋणी राहील.
यानंतर सहलीला सुरुवात झाली राहण्याच्या ठिकाणी बस 5 वाजता पोहोचली यानंतर जेवण केले. थोडा आराम करून संस्थेच्या सर्व अंगांची सामुहिक मिटिंग घेण्यात आली. विविध विषयांवर चर्चा झाली. सर्वांनी आपल्या परीने संस्थेच्या वाटचाली विषयी विचार मांडले व मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सर्वांनी सहलीचा आनंद घेत मजा-मस्ती-धमाल केली.
अशाप्रकारे वृक्षारोपण व आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच पावसाळी सहल असा एकत्रित कार्यक्रम विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई, युवामंच, पतपेढी, महिला संघटना, विश्वकर्मा पंचाल, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांच्या उपस्थितीत पार पडला. या उपक्रमांना जे देणगीदार लाभले त्याचे युवामंचतर्फे जाहीर आभार. यापुढे वृक्षसंवर्धनासाठी निधीची आवश्यकता आहे तेव्हा इच्छुक समाजबांधवानी देणगी देऊन सहकार्य करावे. असेच सहकार्य आणि प्रेम मिळत राहो ही विश्वकर्मा चरणी प्रार्थना!
युवामंच, मुंबई