विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संचालित “युवामंच“ “ रौप्यमहोत्सव 2022“ निमित्ताने युवामंच आणि महिला संघटना सयुक्त विद्यमाने दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी महिलांसाठी विशेष-व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. ’आराना सोल्युशन प्रा. लि. उद्योजक निर्मिती केंद्र“ चे डिरेक्टर श्री सुदेश देसाई सर व अमृता महाजनी मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीधर रा. सागवेकर, वि.पं.सु.महासंघ चे सरचिटणीस सदानंद द. नगरकर, वि.सु. स.पतपेढीचे अध्यक्ष मनोहर ल. पालकर, संस्थेचे माजी अध्यक्ष विलास वि. वाडेकर, विश्वकर्मा पंचाल मासिकाचे संपादक सुनील द. देवरुखकर, सहचिटणीस अशोक रघुनाथ पालकर, कार्याध्यक्ष सौ. वैशाली वि. करंजवकर, कार्याध्यक्ष सुनील स. सागवेकर, महिला संघटना अध्यक्षा श्रीमती अनिता प्रमोद सागवेकर, वि.सु.स.पतपेढीचे संचालक रविंद्र ग. करंजवकर, युवामंच- अध्यक्ष गणेश द. सागवेकर, सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर, सहचिटणीस संकेत स. नगरकर, सहचिटणीस संदीप वि. वाडेकर, कार्यध्यक्ष प्रसाद ग. चिखलकर व मंगेश र. पालकर, अमित म. पालकर, खजिनदार ओंमकार सु. सागवेकर व उपखजिनदार श्री आशिष अ. पालकर, युवामंच माजी अध्यक्ष निलेश बा. सागवेकर, आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. एकूण 80 समाजबांधवानी या शिबीराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात महिला संघटना कार्यकर्त्या सौ. विभा गणेश सागवेकर यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून केली. प्रथेप्रमाणे मान्यवरांना व्यासपिठावर आमंत्रित करण्यात आले. आपले आराध्य दैवत विश्वकर्मा महाराज आणि संत नरहरी महाराज यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आपल्या समाजातील महिलांना संघटीत करण्यासाठी विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई ’महिला मंडळ 1995“ साली स्थापन करण्यात आले. आजपर्यत महिला मंडळाने विविध कार्यक्रम राबविले आहेत. व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेण्यामागचा उद्देश एवढाच कि, आपल्या समाजातील महिला घरातील प्रपंचात अडकून न राहता एकविसाव्या शतकात स्वतचे मानाचे स्थान आणि स्त्राr शक्तीची वेगळी छाप निर्माण करावी. याच अनुषंगाने स्वतचा आणि कुटुंबाचा आर्थिक स्तर कसा वाढवता येईल आणि त्यासाठी कोणता व्यवसाय आपण करू शकतो. आज व्यवसायासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तावना झाल्यावर कार्यक्रमाची पुढील सूत्र युवामंच सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर याच्याकडे देण्यात आली. त्यांनी उपस्थित महिलांचे युवामंचच्या वतीने स्वागत केले. शिबिराला उपस्थित राहिल्याबद्दल अभिनंदन व आभार मानले. या व्यवसाय मार्गदर्शन शिबीरामध्ये • विविध व्यवसाय संधी, • व्यवसाय मार्केटिंगचे मार्गदर्शन, • फायनानशियल मॅनेजमेंट, • शासकीय योजना, • व्यवसाय लोन योजना अशा सर्वांगिक विषयांची माहिती घेणार आहोत, तेव्हा लक्षपूर्वक ऐकावे आपले प्रश्न विचारावेत असे आवाहन केले. यानंतर युवामंच-सहचिटणीस संकेत स. नगरकर यांनी शिबिराचे मार्गदर्शक श्री सुदेश देसाई सर यांची ओळख करून दिली. AARANA SOLUTION Pvt Ltd चे संस्थापक आणि संचालक व 25 वर्षांहून अधिक काळ स्वतःचा व्यवसाय करण्याचा अनुभव ’स्पेशॅलिटी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी“ चे मालक, फूड प्रोसेसिंग मशीन्स, विशेषतः डिहायड्रेटर मशीन्स तयार करणे. उद्योजकता विकास कार्यक्रम आणि विविध कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करणे. थोडक्यात.... प्रशिक्षण आणि समर्थनाद्वारे समाजात उद्योजक निर्माण करण्यात गुंतलेले बहुगुणी मार्गदर्शक आज आपल्याला लाभले आहेत. युवामंचतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे युवामंचतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील व्यवसाय मार्गदर्शन करण्यास श्री सुदेश देसाई सर आणि अमृता महाजनी मॅडम यांना विनंती करण्यात आली.
शिबिराची सुरुवात अमृता महाजनी मॅडम यांनी प्रात्यक्षिक दाखवून सुरुवात केली. यामध्ये त्यांनी अगदी पाच मिनिटात सुगंधी सेंट बनवून दाखविले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. एवढया कमी वेळेत प्रॉडक्ट बनवून त्याचे कॉस्टिंग कसे असू शकते तसेच लागणारे साहित्य कुठे चांगले मिळते, त्याचे मार्केटिंग कसे करता येऊ शकते याची सविस्तर माहिती दिली. सर्वांनी टाळ्या वाजवून मॅडमचे आभार मानले. यानंतर सुदेश देसाई सर यांनी माहिती देण्यास सुरुवात केली, व्यवसाया संबंधी लागणारे कौशल्य याबद्दल सखोल माहिती दिली. व्यवसाय सुरू करण्यासाठी पायऱया • व्यवसायाच्या संधी शोधा, • तुमची व्यवसाय कल्पना निवडा, • मार्केट सर्व्हे करणे, • तुमचा व्यवसाय अंतिम करा, • अभ्यास तंत्रज्ञान उपलब्धता/खर्च, • तुमच्या व्यवसायाचे स्थान निवडा, • व्यवसाय योजना तयार करा, • वित्त व्यवस्थापन, • उत्पन्नाचे अनेक स्त्राsत ओळखा, • विपणन योजना तयार करा, • कृती आराखडा तयार करा, • भरतीसाठी योजना, • परवाना आणि नोंदणी करा, • भव्य लाँचिंगची योजना या सर्व बाबींवर सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे व्यवसायासाठी लागणारे आर्थिक भांडवल कसे उभे करणाऱयासाठी सरकारी योजना कोणत्या आहेत ते सांगितले. • PMEGP -Prime Minister Employment Generation Program, • CMEGP-Chief Minister Employment Generation Program, • MUDRA-Micro Units Development & Refinance Agency Ltd., • STANDUP INDIA, • CGTMSE -Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises (CGTMSE), • PMFME-PM Formalisation of Micro food processing Enterprises या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. कोणाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर, वैयक्तिक संपर्क केल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचे आभार मानले. यानंतर युवामंच सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर यांनी सुदेश देसाई सरांचे अतिशय उपयुक्त व संदर्भासहित माहिती दिल्याबद्दल युवामंच आणि उपस्थित सर्वांच्या वतीने आभार मानले. यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. सदानंद द. नगरकर यांनी युवामंचचे असे महिलांसाठी उपयुक्त शिबीर आयोजित केल्याबद्दल आभार मानले. उपस्थित महिलांनी या माहितीचा पुरेपूर वापर करून व्यवसाय मोठा करावा. आज जे सुदेश सरांचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल सरांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. संपादक सुनील द. देवरुखकर यांनी प्रथम युवामंच आणि महिला संघटना असा संयुक्त कार्यक्रम घेतला त्याबद्दल युवामंच टीमचे अभिनंदन केले. आज जी माहिती मिळाली आहे विशेष करून आर्थिक व्यवस्थापन कसे करावे यासाठी सरकारी योजना कोणत्या आहे ते सरांनी सांगितले. अशी माहिती सहजासहजी मिळत नाही, आज ती मिळाली आहे त्याचा उपस्थित सर्वानी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले. महिला अध्यक्षा श्रीमती अनिता प्रमोद सागवेकर यांनी महिलांचा प्राधान्याने विचार करून युवामंचने प्रोग्रॅम आयोजित केला याबद्दल कौतुक व्यक्त केले. उपस्थित महिलांनी मिळालेल्या माहितीचा योग्य वापर करून आपला व्यवसाय करावं असे आवाहन केले व सुदेश सरांचे महिला संघटनेच्या वतीने आभार मानले. वि. सु. स. पतपेढी चे संचालक रविंद्र करंजवकर यांनी आजचे शिबिर खूपच उपयुक्त होते याबद्दल सरांचे व युवामंचचे आभार मानले व युवामंचला पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष श्रीधर सागवेकर यांनी शिबिरात मिळालेली माहिती खूपच उपयुक्त आहे. समाजातील महिलांनी या माहितीचा योग्य वापर करीत आपला व्यवसाय प्रगतीपथावर आणायचा आहे असे आवाहन केले. सरांचे संस्थेच्या वतीने आभार मानले व युवामंचचे अभिनंदन केले. युवामंच-अध्यक्ष गणेश द. सागवेकर यांनी उपस्थित महिलांचे कार्यक्रमाला आभार मानले. मिळालेल्या माहितीचा योग्य वापर करावा. तरच हा प्रोग्रॅम खऱया अर्थाने सार्थ होईल. युवामंच याहीपुढे असे कार्यक्रम आयोजित करेल त्यांना असाच प्रतिसाद मिळावा असे आवाहन केले. अशाप्रकारे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिराला महिलांचे रजिस्ट्रेशन होण्यासाठी सौ. विभा ग सागवेकर यांनी विशेष प्रयत्न केले तसेच रुची रविंद्र सागवेकर यांनी देणगी देऊन अल्पोपहारासाठी हातभार लावला. या कार्यक्रमाचे शुटींग करून युटूब वर प्रसिद्धी करण्यासाठी प्रगत महाराष्ट्र चे संपादक श्री दत्ताराम दळवी व संपादक सुनील द. देवरुखकर यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी युवामंच कार्याध्यक्ष प्रसाद चिखलकर आणि खजिनदार ओमकार सागवेकर यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्वांचे व उपस्थित सर्वांचे युवामंच सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने शिबीर संपविण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक देत आहोत, इच्छुक महिलांनी याचा लाभ घ्यावा.
आराना सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड
3 कौमुदी बिल्डिंग, डॉ. वसंतराव रथ मार्ग, अमिगो हॉटेलच्या मागे, दादर(प), मुंबई-400028,
9223357207 /9820367618
युवामंच, मुंबई