Card image cap
सध्य परिस्थितीत समाजबांधवांकरिता मदतीचा हात व वार्षिक उपक्रम म्हणून विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संचालित "युवामंच" तर्फे गरजू विद्यार्थ्यांस मोफत वह्या वाटप उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रम हा फक्त मुंबई जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवण्यात आला होता. एकुण ९४ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करून आम्हाला ५६४ वह्या वितरण करण्यासाठी प्रतिसाद दिला. प्रथम सर्व युवामंच कार्यकर्त्यांचे, संस्था कार्यकर्त्यांचे, समाजबांधवांचे आम्ही आभारी आहोत. यांच्या सहकार्यामुळे आम्ही कार्यक्रम यशस्वी करू शकलो. कार्यक्रमाचे पूर्वनियोजन युवामंच सेक्रेटरी श्री. अतुल रामचंद्र देवरुखकर यांनी बनवलेल्या ऑनलाईन लिंकवर सर्व युवामंच पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन ९४ मुलांची नाव नोंदणी केली. युवामंच कार्याध्यक्ष श्री. मंगेश रमेश पालकर यांनी उपक्रमाचे नियोजन केल्याप्रमाणे सातत्याने युवामंच व इतर विभागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून विध्यार्थ्यांच्या नोंदणीबद्दल विचारपूस केली. यामुळे नावनोंदणीत सातत्याने वाढ होत गेली. तसेच युवामंच उपखजिनदार श्री. अजय सदानंद आगवेकर यांच्या सहाय्याने वह्यांची घाऊक भावात मागणी करून प्रत्येक वहीवर युवामंचचा स्टिकर लावून प्रत्येकी ६ वह्यांचे बंच करून त्यावर उत्तम प्रकारे प्लॅस्टीकचे आवरण करण्यात आले. यासाठी त्यांना विभागातील श्री विजय सदानंद आगवेकर, कु. अभिजीत विजय आगवेकर, कु. आशिष विजय आगवेकर, कु. आयुष मनोज आगवेकर, कु. हर्ष मनोज आगवेकर, श्री. योगेश बोरसुतकर या कार्यकर्त्यांची साथ मिळाली. या सहकार्याबद्दल युवामंचतर्फे त्यांचे आभार, असेच सहकार्य पुढील उपक्रमात मिळत राहो. यानंतर युवामंच सहसेक्रेटरी श्री. संकेत सदानंद नगरकर, सहसेक्रेटरी श्री. संदीप विलास वाडेकर, कार्याध्यक्ष श्री. प्रसाद गजानन चिखलकर, जनसंपर्क प्रमुख श्री. विलास सदानंद सागवेकर, सदस्य श्री. अमित मनोहर पालकर यांनी विभागवार युवामंच कार्यकर्त्यांकडे वह्या पोहोचवण्याचे कार्य पार पाडले. यासाठी योग्य ती खबरदारी बाळगण्यात आली. तसेच उपक्रमाच्या जमा-खर्चाचे आणि इतर काम कु. ओमकार सुरेश सागवेकर याने उत्तम पार पाडले. उपक्रमाच्या कामकाजासाठी युवामंच अध्यक्ष श्री. गणेश दत्तात्रय सागवेकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळत होते. या उपक्रमास संस्थेचे सचिव श्री. मोहन हरिश्चंद्र नगरकर, कार्याध्यक्ष श्री. प्रकाश अनंत वाडेकर, समाजबांधव श्री. पांडुरंग अनंत पालकर यांनी आर्थिक सहकार्य करून मदत केली. तसेच एका समाजबांधवाने नाव न देण्याच्या अटीवर लहान मुलांना पेन्सिल बॉक्स देऊन आम्हाला उपकृत केले. या सहकार्याबद्दल त्यांचे युवामंचकडून आभार! असेच प्रेम आणि सहकार्य सातत्याने मिळत राहो. सदर वह्या वाटपाचा कार्यक्रम दिनांक १३ सप्टेंबर २०२० रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास विठोबा वाडेकर, सचिव श्री. मोहन हरिश्चंद्र नगरकर, माजी अध्यक्ष श्री. सदानंद दत्तात्रय नगरकर, पतपेढी अध्यक्ष श्री. मनोहर लक्ष्मण पालकर, युवामंच माजी अध्यक्ष श्री. निलेश बाळकृष्ण सागवेकर, युवामंच पदाधिकारी/ कार्यकर्ते आणि संस्थेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्या त्या विभागात घेतला गेला. यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली. तसेच या उपक्रमासाठी जोगेश्वरीचे विभागप्रमुख श्री. अशोक काशीराम नगरकर, श्री. सदानंद पांडुरंग सागवेकर, श्री. चंद्रकांत मनोहर नगरकर यांचे सहकार्य लाभले. सर्वांचे मनःपूर्वक आभार. अशाप्रकारे सध्य परिस्थितीत युवामंच कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक उत्तम प्रकारे उपक्रम पार पाडला. सर्व युवामंच कार्यकर्त्यांचे, संस्था कार्यकर्त्यांचे, विभागप्रमुख आणि ज्या ज्या व्यक्तींचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. सर्व विद्यार्थांनी सध्य परिस्थितीत आपल्या अभ्यासात खंड पडू न देता, अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व भविष्यात भरघोस यश मिळवावे हि सदिच्छा! असेच उत्तमोत्तम कार्यक्रम युवामंच कडून होत राहोत, हि श्री विश्वकर्मा चरणी प्रार्थना.
युवामंच, मुंबई