कुलदैवत खंडोबा
मल्हारी मार्तंड भैरवांचे प्रसिद्ध स्थान म्हणजे जेजुरीचा खंडोबा. महाराष्ट्रात खंडोबा हे चातुवर्ण्याचे कुलदैवत आहे. ब्राम्हण,क्षत्रिय, वैश्य, दलित ह्या सर्वसमाजात आपल्याला खंडोबा कुलस्वामी व तुळजाभवानी कुलस्वामिनी पहावयास मिळते.
उपासना- मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सहा दिवस कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला देवाच्या टाक/ मुर्ती स्वच्छकरुन त्यांची स्थापना करुन देवी नवरात्री प्रमाणे सहा दिवस माळ बांधतात. सहा दिवस घरातील मुख्य व्यक्ति उपवास करतात. मल्हारी महाम्य ग्रंथाचे
वाचन करतात. सहावा दिवस, चंपा षष्ठीला देवांना अभिषेक करुन पूजापाठ झाल्यावर दिवटी कंदलीसह पंचारती होते; त्यानंतर पुरण वरणाचा नैवेद्य दाखवून हळद व खोबर घेऊन तळी भरतात व देवाचे नामस्मरण करतात. ’येळकोट येळकोट जय मल्हार“ सदानंदाचा येळकोट. खंडोबाच्या नावाने चांगभल (चांगभल हा शब्द हिंदीमध्ये चंगेभले हया अर्थाने, विचारपूस सर्वांच चांगल व्हाव अशा अर्थाने आलेला आहे.) जय घोषानंतर हरिद्राचुर्णात मढलेल्या सुक्या खोब-याचा प्रसाद वाटला जातो. अशाप्रकारे देवाची उपासना करावी.
चैत्र पौर्णिमा, आषाढ शुद्ध प्रतिपदा, चंपाषष्ठी, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, महाशिवरात्र, सोमवती अमावस्या ह्या दिवशी खंडोबाच्या यात्रा भरतात व उपासना करणा-या सर्व उपासकांनी हया दिवशी आपल्या कुटुंबात देवाचा कुळाचार करुन नामस्मरण जागरण करुन आनंदोत्सव साजरा करावा.
कुलदैवत भैरीभवानी/भगवत
भैरीभवानीभैरवाची जी अनेक स्थाने आहेत; त्यापैकी काशीचे काळभैरव व जेजुरीचा मार्तंडभैरव ही फारच प्रसिद्ध आहेत. भैरी भवानी व भैरी भगवती या ठिकाणी भैरी हे भैरवाचेच नामाभिमान आहे. भैरवाचे भै-यादेवा, भैरुदेवा, बिरुबा, भैरोबा, भैरी अशी अनेक प्रचलित नावे विविध प्रांतात पहावयास मिळतात भैरी किंवा भैरव म्हणजे शिवश्ंाकर व भवानी / भगवती म्हणजे पार्वती भवानी म्हणजेच तुळजाभवानी (तुळजापुर) उपासना– खंडोबा कुळदेवतेप्रमाणे.
भगवती
कुळदैवत ज्योतिबा
वाडी रत्नागिरी– कोल्हापुर कोल्हापुर पंचक्रोशितील बहुतांश कुळांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे. ज्योतिबा हा खंडोबाचाच अवतार. ज्योतिबा अग्निदेव ज्योतिस्वरुप म्हणून शिवाचे हया ठिकाणी ज्योतिबाच्या दर्शनाआधी नंदादिपातील ज्योतिचे दर्शन व बरोबर काळभैरवाचे पूजन करुनच भक्त ज्योतिबाचे दर्शन करतात.
कुळाचार उपासना- चैत्र पौर्णिमेला हस्त नक्षत्री यात्रा भरते. देवाची पालखी निघते व ह्या वेळेस उंच उंच काट्या निशाण व ज्योतिबाच्या नावान चांगभल ह्या जयघोषाने आसमंत भरुन आणि भारुन जातो अशा प्रकारे देवाचा कुळाचार होतो. रविवारी देवाला नैवेद्य दाखविण्याचा प्रघात आहे.
रविवारी देवतेचे पुजन करुन नामस्मरण करावे. आपल्या प्रकृतिप्रमाणे उपवास करुन नैवेद्य दाखवून उपासना करावी. ज्योतिबा कुलदेवतेचे मानकरी ग्वाल्हेरचे शिंदे व कोल्हापुरचे छत्रपती.
कुळस्वामिनी तुळजाभवानी (तुळजापूर)
संपूर्ण भारताचे आराध्य दैवत व महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापुरची ’भवानी माता“ भव म्हणजे शंकर व भवानी म्हणजे पार्वती भारतात भवानीची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत व त्या ठिकाणी विविध नावांनी भवानी प्रसिद्ध आहे. त्यापैकी काही नावे उमा, गौरी, काली, कात्यायनी, हैमावतीधरी, शिवा, भवानी, रुद्राणी, शर्वाणी, सर्व मंगला, अपर्णा, पार्वती, दूर्गा, मृडानी, चंडिका, अंबिका, आर्या, दाक्षायणी, चैव, गिरीजा, मेनकात्मजा.
कुळाचार उपासना- गोंधळी गोंधळ घालत सर्व देवदेवतांना गोंधळाच्या माध्यमातून देवीच्या पुजेला येण्याचे आवतान देतात. गोंधळाच्या पुजेसाठी चौक मांडून पूजा आरती करुन रात्रभर गोंधळी आईचे गुणगाण करत जागर करत जागरण करतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत नवरात्रौत्सव सर्वात मोठा उत्सव असतो. ह्या दिवशी देवीची विधीयुक्त पूजा करुन देवीचा कुळधर्म कुळाचार करावा पंच पक्वानाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा. देवीची स्त्राsत्र अष्टके आरत्या पदे वगैरे म्हणावीत नामजप करावा देवीचे गुणगाण गावे अशारितीने कुलस्वामिनी तुळजाभवानीची उपासना करावी.
कुलदैवत उमामहेश्वर
चंद्रवंशामध्ये गार्ग्य व मार्कंडेय ऋषिंच्या गोत्रातील कुळांचे कुलदैवत उदा. अहिरराव, आंग्र, खैर, जगदळे, ढवळे, दरबारे, पालवे, पिंगळे, फाळके, मोहिते, रेणुसे अंतर्गत कुळी असणा-या कुलांचे कुलदैवत आहे.
कुळाचार उपासना– खंडोबा कुळदेवतेप्रमाणे.
कुलदैवत – श्रीमोहिनीराज (नेवासे)
मल्हारी मार्तंड खंडेरायाची ही सासुरवाडी. म्हाळसा आईच माहेर नेवासे हे शिवतीर्थ असल्यामुळे पूर्वी येथे पादत्राणे वापरत नसत. ह्या ठिकाणी ही खंडोबाची मोठी यात्रा भरते. म्हाळसा आदिशक्तिचे हे स्थान अर्धनारी नटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे हे कुलदैवत आहे.
उत्सव- कुळाचार–माघ अष्टमी पौर्णिमा उत्सव असतो. पौर्णिमेला कुळाचार केला जातो. ह्या ठिकाणी जळते कुंड हातात घेऊन भक्त नाचतात. यास भळदे म्हणतात.दूस-या दिवशी सरकारी अधिकारी देवतेचे पूजन करतात. येथील मानकरी – देशपांडे, निकम, देशमुख व मोहिते.
कुलदैवत – जगदंबा (प्रतापगड)
शिवछत्रपतींची कुळस्वामिनी तुळजापूरची भवानी माता. भवानीच्या दर्शनाला वारंवार जाता येत नाही मग तिचं नित्य दर्शन कसे होईल ह्याच विचारातून शिवछत्रपतींनी प्रतापगडावर तुळजा भवानीची स्थापना केली.
कुळाचार उपासना-तुळजाभवानी प्रमाणे खंडेनवमी, दसरा ह्या दिवशी उत्सव.
मानकरी – भोसले, सिशोदे
कुळदैवत – सप्तशृंगीदेवी
वणी (नाशिक) हे दुर्गा शक्ति पिठ असुन वणी येथील सप्तशृंगगडावर दुर्गा अठराभुजाधारी अवतिर्ण झाली आहे. हे साडेतीन पैकी ½ पिठ असून महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीचे ओंकाररुप समजण्यात येते. शुभंनिशुभं व महिषासुराचा नाश केल्यावर तप साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले आहे. सह्याद्रिच्या ह्या कड्यास सात शिखरे असल्यामुळे या स्थानाचे नांव सप्तशृंग असे झाले.
कुलस्वामिनी अंबाबाई (ब्रम्हमाया)
कोल्हापुर-
महालक्ष्मी ही आदीशक्ति महामाया जगदंबा ह्या नावाने प्रसिद्ध आहे. जगाच्या उद्धारासाठी व दृष्टांच्या संहारासाठी वेळोवेळी अवतार घेऊन अवघ्या जगाला सुखी करणारी आदिशक्ती भुवनेश्वरी महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर येथे आहे. हे महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैंकी एक असून ह्या मंदिराची रचना श्री यंत्राच्या सर्वतोभद्र आकारात असून हे मंदिर नक्षत्राकार आहे. उत्सव दर शुक्रवारी पालखी सोहळा चैत्रात वसंत नवरात्री व अश्विनात शारदिय नवरात्रौत्सव मोठ्या थाटात साजरा होतो.
कुलस्वामिनी महाकाली - (माहुरची रेणुकामाता)
मराठे भोपी व ब्राम्हण यांच्या हक्क देवतेचे तीन वेळा पूजन होते.मंदिरात नंदादिप आहे. पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. गुढिपाडवा, आषाढ श्रावणातील पौर्णिमा, नवरात्र व ग्रहण कालावधिमध्ये यात्रा करतात. रेणुका मातेची स्थाने- सौदती येथील रेणुका देवी, लोणवळा, एकविरा देवी.
कुलदैवत – एकविरामाता (कार्ले लोणावळा)
जनार्दन स्वामिंनी स्थापलेली एका विराची माता म्हणजेच माहूरगडची रेणुकामाता होय. चांद्रसेनिय कायस्थप्रभु, चौकळशी, पाचकळशी, कोळी, आगरी, माळी, कुणबी लोकांची कुलस्वामिनी एकविरामाता होय. कुळाचार- चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्र हा मोठा उत्सव असतो. चैत्र शुद्ध सप्तमीला एकविरादेवीची यात्रा सुरु होते. ती पौर्णिमेला समाप्त होते.
कुलदेवता वज्रेश्र्वरी देवी
ठाणे जिह्यातील वज्रेश्र्वरी क्षेत्री, आदिमाया पार्वती शक्तीरुपाने वास करते हे वज्रेश्र्वरी देवतेचे मुळस्थान, ठाणे जिह्यातील ग्रामिण भागात अनेक आदिवासी समाजाची ही कुलदेवता आहे. येथे गरम पाण्याची कुंडे प्रसिद्ध आहेत.
कुलस्वामिनी सातेरीदेवी-
महाराष्ट्र, गोवा सिमेवरील गावातील बहुतांश लोकांची सातेरीदेवी ही कुलस्वामिनी आहे. सातेरीदेवीचे भक्त श्री. सातेरी देवीचे बरोबर रवळनाथ किंवा भैरवनाथ. काळभैरव यांचेसुद्धा पुजन करतात. श्री. सातेरीदेवीच्या देवळात वारुळालाच देवी स्वरुप मानून पूजन करतात.
कुलस्वामिनी महालक्ष्मीमाता – मुंबई
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती (मुंबई)
कुलस्वामिनी काळुबाई (मांढरदेवी)- मांढरगड सातारा
सातारा जिह्यातील मांढरदेव गावी हेमांडपंथीय काळुबाईचे मंदिर आहे. कालीका देवीच्या भक्तांसाठी देवीने या ठिकाणी अवतार घेतला म्हणून ह्या कालिकामातेला मांढरची काळूबाई म्हणतात.
कुळाचार- पौष महिन्यात मोठी यात्रा भरते. देवीचा कुळाचार, नवस पूर्ण केले जातात. तसेच् अश्विन नवरात्र व मार्गशिर्ष महिन्यामध्ये जत्रा भरते. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश दलित समाजामध्ये काळुबाई कुलदेवता आहे.
कुलदैवत – शिखर शिंगणापुर
सोलापूर व कोल्हापूर जिह्याच्या सीमेवर वसलेले हे स्थान या ठिकाणी शिवपार्वती हे लिंग रुपाने अवतिर्ण झाले आहेत. छत्रपति शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत आहे.
कुळाचार- चैत्र शुद्ध पंचमीस यात्रा भरते. शिवपार्वतीचा विवाह सोहळा पार पाडतात. कावडीने पाणी आणून कावडीने अभिषेक करण्याची प्रथा आहे. तसेच ह्या ठिकाणी असणा-या गुप्तलिंगाचे पुजन व दर्शन झाल्याशिवाय कुळाचार पूर्ण होत नाही शिवपार्वतीच्या मिलनाची साक्ष म्हणुन ह्या ठिकाणी गुप्तलिंग, गोमुखातून अविरत झरणारे पाणि व शिवपार्वती ह्यांची दोन लिंग असे विलोभनीय शिवशक्तीचे दर्शन ह्या ठिकाणी पहावयास मिळते.
कुलस्वामिनी शांतादुर्गाः-
सारस्वत ब्राम्हणाचे कुलदेवता असून गोव्यातील कवळे ह्या शांतादुर्गाचे सुंदरमंदिर आहे. देवीची नित्यमहापूजा होते. प्रत्येक महिन्याच्या पंचमीला शिविकोत्सव साजरा होतो. माघ महिन्यांच्या प्रतिपदेपासून पंचमी पर्यंत मोठा उत्सव साजरा होतो. शैव-वैश्र्णवा सह शक्तिचे विलोभनीय रुप ह्या ठिकाणी पहावयास मिळते.
कुळाचार-देवीची अभिषेक महापूजा हेते. नवचंडी, होम-हवन, जपाद्वारे मंगलमय वातावरणात देवीचा कुळाचार पार पाडला जातो. मानाची ओटी भरुन कुळाचार पूर्ण केला जातो. 96 कुळांमध्ये प्रचलित गोत्रांच्या कुलदेवतांचे टाक ह्या ठिकाणी छापत आहोत ह्या सर्व कुलदेवतांबद्दल अधिक माहिती आपल्याकडे असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.
किरणोत्सव- माघ शुद्ध पंचमिचे सुमारास सूर्य किरणे देवीचे मुखावर पडतात व त्या वेळेस किरणोत्सव साजरा होतो. अक्षय तृतीयेत देवीचे हळदी कुंकू असते. सर्व जाती स्त्रिया ह्या वेळेस जमा होतात व एकमेकांची ओटी भरतात.
व्रत प्रमुख विधी- हळदी कुंकवाचारुडा, पुंकुम अर्चन, गंधपूजा व श्रावणातील वरदलक्ष्मीव्रत
देवीचा उपासनेसाठी मंत्र-
नमो देवै महादेव्यै शिवायै सततंनम ।
नम प्रकृत्यै भद्रायै नियतप्रणताःस्मृताम् ।।
।। श्री महालक्ष्मी नमन अष्टक।।
श्री गणेशाय नम । इंद्र उवाच ।
नमस्तेस्तु महामाये, श्रीपीठे सुरपुजिते । शंखचक्रगदाहस्ते, महालक्ष्मी नमो।़स्तुते ।। 1।।
नमस्ते गरुडारुढे, कोलासुरभयंकरी । कुमारी वैष्णवी ब्राम्हि, महालक्ष्मी नमो।़स्तुते ।। 2।।
सर्वज्ञे, सर्ववरदे, सर्वदुष्टभयंकरी । सर्वदुःखहरे देवि, महालक्ष्मी नमो।़स्तुते ।। 3।।
सिद्धीबुद्धीप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायनी । मंत्रमूर्ते सदादेवि, महालक्ष्मी नमो।़स्तुते ।। 4।।
आद्यन्तरहिते देवि, आद्यशक्ति महेश्वरी । योगजे योगसंभूते, महालक्ष्मी नमो।़स्तुते ।। 5।।
स्थूलसुक्ष्मेमहारौद्रे महाशक्ति महोदरे । महापापहरे देवि, महालक्ष्मी नमो।़स्तुते ।। 6।।
पद्मासनस्थिते देवि, परब्रम्हस्वरुपिणि । परमेशि जगन्मातार्महालक्ष्मि नमो।़स्तुते।। 7।।
श्र्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते । जगतस्थिते जगन्मातार्महालक्ष्मि नमो।़स्तुते ।। 8।।