हिंदू संस्कृतिमध्ये कुळदेवतेच्या उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच संत वचन आहे “कुळीचा कुळाचार करावा नेटका” म्हणजेच कुळधर्म कुळाचाराचे योग्य पालन केल्यास शारिरिक, मानसिक, आर्थिक व अध्यात्मिक विकासाला चालना मिळते. मग हि कुळदेवतेची उपासना कशी करायची.
महाराष्ट्रातील बहुतांश लोकांच कुळदैवत भैरव आहे. तद्नंतर उमामहेश्वर, ज्योतिबा, प्रभाकर प्रभवती, ब्रम्हनाथ, बद्रिनारायण, काशिविश्वेश्वर, महाकाळेश्वर, लक्ष्मीकेशव तसेच् कुळस्वामिनी म्हणून तुळजाभवानी, ब्रम्हमाया (कोल्हापूरची अंबाबाई ), चामुंडेश्वरी, जगदंबा (प्रतापगड), कात्यायनीदेवी, महाकाली (माहुरची रेणुकादेवी), जोगेश्वरी महाकाळी (कलकत्ता),एकविरामाता, वैष्णवीदेवी (काश्मिर).अशा प्रकारे प्रचलित कुळदेवतांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्हाला जर आपल्sढ कुळदेवत माहित नसेल तर तज्ञांच मार्गदर्शन घ्यावे. ज्यांना आपले कुळदेवत माहित आहे त्यांनी कुळदेवतेच्या टाकाची स्थापना करावी त्यानंतर उपासनेला सुरुवात करावी.
कुळदेवतेची नित्य उपासना प्रथम संकल्प, मी .....................
(आपले नाव, आपले मुळ गाव यांचा उल्लेख) यथामती, यथाशक्ति, यथाज्ञानाने तुझी सेवा करत आहे. त्यात काही चूक झाल्यास क्षमा असावी. मी करत असलेली उपासना आपल्या चरणी रुजु व्हावी तसेच् मला व माझ्या कुटुंबाला निरंतर कृपाशिर्वाद देऊन , जन्मोजन्मी तुमची सेवा करण्याच भाग्य लाभू दे असा संकल्प झाल्यानंतर कुळदेवतेचे टाकाचे पूजन करावे. पूजानंतर नामस्मरण करावे.
नामस्मरण
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्र हांरा सदावसंत हृदयारविंदे भवं भवानी सहिंतनमामि ।। . . . . . कुळस्वामिनी नमो नम। (गाळलेल्या जागी आपल्या कुळदेवतेचे नाम घ्यावे. नामस्मरणानंतर ।। ॐ चैतन्य कुळदेवतायै नमो नम ।। हा मंत्र 21 वेळा म्हणावा. यानंतर डोळेबंद करुन शांत चित्ताने कुळदेवतेचे स्मरण करावे. प्रत्यक्ष शक्तिरुपाने आमच्या कुटुंबासवे राहण्याची विनंती करावी सर्व चांगल्या कार्यात सहाय्य करावे अशी प्रार्थना करुन साष्टांग नमस्कार करावा.
उपासनेसाठी कुळदेवतेची विविध मंत्र
- सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
- शरण्ये त्रंब्यके गौरी नारायणी नमोस्तुते।।
- ॐ ऐ ह्रीं क्लीं चामुंडाय विच्य्ये
- देहि सौभाग्य आरोग्यं देहि मे परमसुखम्।
- रुपं देहि जयं देहि यशो देहि व्दिषोजहि।।
- सर्व बाधा प्रशमनं त्रैलोक्ससा ।़ खिलेश्वरी ।
- एकमेव त्वया कार्य मस्मत व्याथी विनाशनम्।।
- या देवी सर्वभुतेषु शक्ति रुपेण संस्थिता ।
- नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम ।।
कुळदेवतेची नैमित्तिक उपासना
आपल्या कुळदेवतांचे वार्षिक उत्सव, महत्वाचे दिनी केल्या जाणा-या पुजा ही नैमित्तिक उपासना आनंदोत्सव यात्रा, जत्रा म्हणून साजरे केले जातात.
कुळदेवतेची काम्य उपासना
विवाह, संतानप्राप्तिमध्ये अकारण विलंब होत असता ज्या उपासना केल्या जातात त्यात कुळदेवतेच्या वाराला एकवेळचे भोजन करुन उपवास केला जातो. षोडशोपचारे कुळदेवतेचे पुजन केले जाते कुळदेवतेचे नामस्मरण करुन अनन्यभावाने कुळदेवतेला शरण जावुन कार्याची पुर्ती होण्यासाठी आपल्या आईची केलेली आळवणी म्हणजे कुळदेवतेची काम्य उपासना.
कुळदेवतेची निष्काम उपासना
निवृत्तीनंतर पुरुषाने व उतारवयात स्त्रिने आपले स्वास्थ्य चांगले राहण्यासाटी करावयाची उपासना. उभ जीवन आनंदमय उपभोगल पण जीवनाची अखेर ही पवित्र व्हावी हयासाटी कोणताही संकल्प, पुजा, पाठ न करता फक्त कुळदेवतेचे अखंड नामस्मरण म्हणजेच कुळदेवतेची निष्काम उपासना होय.