१) संस्था (स्थापना व माहिती):-
समाजाचे हित साधणे आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने सन् १९६६ साली, "विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई (रजि.)" या संस्थेची स्थापना करण्यात आली. समाजकार्यात स्वतः कार्यरत राहून आपल्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तन, मन, धन अर्पण करून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक. धार्मिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण पावले उचललेली आहेत. महाराष्ट्रभर खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत समाज जागृती करून सभा, दौरे, मेळावे, परिषदा भरवून समाजात ऐक्यप्रबळ करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संस्थेचे निस्वार्थी प्रभावी कार्य, निष्ठा, आपुलकी, पंचाल सुवर्णकार ज्ञाती समाजाची अस्मिता पाहून ज्ञातीजनही प्रेरित झाले आणि सामाजकार्याकडे आकर्षित झाले आहेत. एक आदर्श संस्था म्हणून आपल्या संस्थेकडे अभिमानाने पहिले जात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. संस्थेने अनेक साहसी कार्यक्रम हाती घेऊन जे यश मिळविले आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मिळाले आहे. हे यश म्हणजेच...!!! तुमचे आमचे सर्वांचेच आहे.
२) पतपेढी :-
आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून प्रथमतः "विश्वकर्मा सुवर्णकार सहकारी पतपेढी (मर्या.)" या नावाने पतपेढीची स्थापना दिनांक २ जून १९९२ रोजी करण्यात आली. पतपेढीची स्थापना झाल्यापासून पतपेढीची भरभराटी होण्यास सुरुवात झाली. आज आपली सभासद संख्या ----- असून दामदुप्पट ठेव, मुदतठेव, विश्वकर्मा सुवर्णकार दैनंदिन ठेव योजना अशा विविध योजनांना समाजबांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे सारे यश मिळाले आहे ते संचालक मंडळाचे नेत्रदीपक कार्य, अविश्रांत मेहनत व आपल्या सारख्या सुज्ञ व दानशूर समाजबांधवांमुळेच.
३) विश्वकर्मा पंचाल वृत्तपत्र:-
पंचाल सुवर्णकार समाजाचे भारत सरकार मान्यताप्राप्त एकमेव बुलंद मासिक दिनांक १९ फेब्रुवारी १९९५ रोजी स्थापन झाले. समाजाला एक स्वयंशक्तीरूपी प्रसार माध्यमाचे व्यासपीठ लाभले आहे व या माध्यमातून समाजाला भेडसावणाऱ्या जटील समस्या मांडल्या जात आहेत. पंचाल सुवर्णकार मासिकाने अल्पावधीत मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक लेखक, समाज हितचिंतक यांच्याबरोबर गरुडझेप घेऊन महाराष्ट्रात समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. १९९५ च्या मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या स्पर्धेत आपल्या पंचाल सुवर्णकार वृत्तपत्र पुरस्कृत दिवाळी अंकास ''विशेष दर्पण पुरस्कार'' मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.
४) महिलामंडळ:-
आपल्याच समाजातील महिलांना एकत्रित आणण्यासाठी व संघटीत करण्यासाठी "विश्वकर्मा सुवर्णकार समाज- "महिलामंडळ'' -------- या साली स्थापन करण्यात आले. या महिला मंडळाच्या अनुषंगाने महिलांनी विशेष कार्यक्रम राबवले जसे हळदीकुंकू समारंभ, मंगळागौर तसेच बरेच सांस्कृतिक कार्यक्रमही राबविले आहेत. या मागचा उद्देश एवढाच कि आपल्या समजतील महिला या चूल, मुल व प्रपंच यात अडकून न राहता आजच्या एकविसाव्या शतकातल्या सुशिक्षित समाजात एक मानाचे स्थान आणि स्त्रीशक्तीची एक वेगळी छाप निर्माण करावी.
५) युवामंच:-
आपल्या समाजातील ज्ञातीबांधवांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करून त्यांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीने व आपल्या समाजातील युवा वर्गाला एकत्र आणण्यासाठी आपल्या समाजातील वरिष्ठांनी "युवामंच" ची स्थापना केली हा या मागील मुळ उद्देश होता. तसेचनवीन युवा वर्गाला समाजातील रूढी परंपरा यांची माहिती व्हावी व आपल्या अंगी असलेल्या कला गुणांचा वापर करून समाज बळकटीसाठी एकत्र येऊन समाजाची उन्नती करावी.
विश्वकर्मा सुवर्णकार समाजाचे इतरही काही घटक आहेत त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :-
अ) शिरगणती
ब) शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा
क) वधू-वर सूचक केंद्र
ड) धार्मिक परंपरांचे जतन (मौजीबंधन, श्रावण्या, हळदीकुंकू समारंभ व संतशिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी)
इ) तक्रार निवारण समिती