रत्नागिरी-युवामंच विजेता तर वि.सु.ज्ञा.स.गिरगाव मुंबई उपविजेता ठरले
विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संचालित ’युवामंच“चे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु आहे. यानिमित्ताने ’युवामंच“ च्या मार्फत ’महाराष्ट्रातील सुवर्णकार समजाअंतर्गत अंडरआर्म बॉक्स भव्य क्रिकेट सामने“ दिनांक 26 व 27 नोव्हेंबर 2022 (शनिवार / रविवार) रोजी नयन कारंडे मैदान (लाल मैदान), परेल येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास समाजातील युवावर्गाचा विशेष सहभाग लाभला. यामध्ये तब्बल 17 संघ सहभागी झाले होते. यामध्ये दिवा- डोंबिवली, मीरा रोड ते डहाणू, नवी मुंबई, कुर्ला, गोवंडी, वि.सु.ज्ञा.स. गिरगाव मुंबई, जोगेश्वरी, विलेपार्ले-अंधेरी, लालबाग-काळाचौकी, परेल, रत्नागिरी रत्नदुर्ग, रत्नागिरी-युवामंच, महाड(पोलादपूर), दापोली(पालगड), महाड-नडगाव, आंबोली- अंधेरी, मालाड-कांदिवली या संघांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तर युवामंच, माजी युवामंच, वि.सु.स.मुं. कार्यकारिणी 1, वि.सु.स.मुं. कार्यकारिणी 2 या संघानी प्रोत्साहन म्हणून सहभाग घेतला होता. अशा एकूण 21 टीमचे सामने खेळविण्यात आले. एकूण 17 संघांमध्ये लढत होऊन अखेर प्रथम पारितोषिक- रत्नागिरी-युवामंच तर व्दितीय पारितोषिक- वि.सु.ज्ञा.स. गिरगाव मुंबई हे विजेते ठरले. तर उत्कृष्ट फलंदाज- नितेश देवरुखकर(रत्नागिरी), उत्कृष्ट गोलंदाज-योगेंद्र सागवेकर (गिरगाव) आणि मॅन ऑफ दि सिरीज- शुभम सोनार यांना मिळाले. या विजयी संघांचे, खेळाडूंचे व उपस्थित पदाधिकारी, समाजबांधवांचे युवामंचकडून जाहीर आभार!
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वि.सु.स. मुंबई अध्यक्ष श्रीधर रामचंद्र सागवेकर, सरचिटणीस मोहन हरिश्चंद्र नगरकर, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार महासंघ सरचिटणीस सदानंद दत्तात्रय नगरकर, माजी अध्यक्ष विलास विठोबा वाडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष संजय सखाराम देवरुखकर व उदय रामचंद्र सागवेकर, सहचिटणीस अशोक रघुनाथ पालकर व राजेंद्र वासुदेव पंडित, कार्याध्यक्ष श्री प्रकाश वाडेकर, खजिनदार संतोष वि. देवरुखकर, सहखजिनदार प्रशांत अ. पालकर, शि.स.प्रमुख रामचंद्र सि. सागवेकर व समर्थ सत्यवान पालकर, कार्यकारणी सभासद दीपक रघुनाथ सागवेकर, भरत रघुनाथ सागवेकर, संजय कृष्णा देवरुखकर, जोगेश्वरी चे विभाग प्रमुख अशोक काशिराम नगरकर, घाटकोपर विभाग प्रमुख - सुहास बसणकर, वि.सु.स.पतपेढी उपाध्यक्ष योगेश ह. सागवेकर, महिला संघटना सदस्या सौ. विभा ग.सागवेकर, कु रत्नावली वा. चिखलकर, श्रीमती रुची र. सागवेकर, युवामंच अध्यक्ष गणेश द. सागवेकर, उपाध्यक्ष विनोद सु. पालकर, सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर, सहचिटणीस संदीप वि. वाडेकर, कार्याध्यक्ष प्रसाद ग.चिखलकर व मंगेश र. पालकर, अमित म. पालकर, खजिनदार ओंमकार सु. सागवेकर व उपखजिनदार श्री आशिष अ. पालकर व अजय स. आगवेकर, विलास स. सागवेकर, सुमित दि. देवरुखकर, अमोल रा.सागवेकर, शुभम रा. सागवेकर, युवामंच माजी अध्यक्ष निलेश बा. सागवेकर, मीरा रोड ते डहाणू शाखेचे अध्यक्ष पांडुरंग गो. वाडेकर व सेक्रेटरी रोहिदास ह. नगरकर, माजी युवामंच कार्यकर्ते सुधीर रा. चिखलकर, समीर म. नगरकर, निलेश सु. नगरकर, विनोद ल. वारणकर, दिनेश सागवेकर तसेच वि.सु.ज्ञा.स. गिरगाव मुंबई संस्थेचे अध्यक्ष विकास नगरकर व माजी अध्यक्ष रवींद्र कृष्णा देवरुखकर, झ्एघ् संतोष नगरकर, दिवा डोंबिवली वरुन एकनाथ पालकर, विरार वरून विलास देवरुखकर, दिगंबर बोरसुतकर तसेच संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे युवामंचतर्फे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन-प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीधर रा. सागवेकर यांच्याहस्ते मैदानाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षांच्या हस्ते नाणेफेक करून उद्घाटनीय सामना युवामंच, मुंबई विरुद्ध माजी युवामंच या संघांमध्ये खेळविण्यात आला. यामध्ये युवामंच, मुंबई संघ विजयी झाला. यानंतर मुख्य सामन्यांना सुरुवात झाली. प्रत्येक टीम आपला सर्वोत्तम खेळ दाखवत होती. प्रत्येक खेळाडूमध्ये जिंकण्याची जिद्द दिसत होती. परंतु कोणी धावचीत होत, त्रिफळाचीत होत, झेलबाद होत सामने रंगतदार होऊन अखेर अंतिम सामना रत्नागिरी-युवामंच व वि.सु.ज्ञा. स. गिरगाव यांच्या नावे नोंदविण्यात आला आणि दोन्ही संघांचा आनंद अवर्णनीय होता. यावेळी युवामंच कार्यकर्त्याच्या चेहऱयावर समाधान दिसत होते. उपस्थित सर्वांना खेळाची मजा लुटायची होती. युवामंचच्या टीम झुंड आणि टीम लगान अशा दोन टीम करण्यात आल्या. मौज-मजा-मस्ती करत खेळलेल्या या सामन्यात अखेर ’टीम झुंड“ विजयी झाली आणि सर्वांनी नाचत आनंद साजरा केला. यानंतर अंतिम सामना रत्नागिरी- युवामंच व वि.सु.ज्ञा.स. गिरगाव मुंबई या संघांमध्ये सामना झाला. अटीतटीचा सामना होत अखेर रत्नागिरी-युवामंच विजेता ठरले. यानंतर वरिष्ठ कार्यकारिणीचा सामना “ग्रीन टीम“ आणि “यलो टीम“ असा खेळविण्यात आला. आपल्या वयाचा कोणताही विचार न करता तरुणाईचा जोश सर्वांमध्ये दिसत होता. दोन्ही संघांमध्ये विजयी होण्याची जिद्द दिसत होती. मौज-मजा-मस्ती करत खेळलेल्या या सामन्यात अखेर ’ग्रीन टीम“ विजयी झाली आणि सर्वांनी जल्लोषात आनंद साजरा केला. यानंतर बक्षीस समारंभास सुरुवात झाली, युवामंच सेक्रेटरी यांनी मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित केले. उपस्थित संघांचे सहभाग घेतल्याबद्दल, तसेच देणगीदारांचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी युवामंचला पुढीलप्रमाणे देणगीदार लाभले. श्री विलास विठोबा वाडेकर यांजकडून प्रथम पारितोषिक रोख रु 5555/- कै. स्वप्नील विलास वाडेकर यांच्या स्मरणार्थ, श्री संतोष पुरुषोत्तम देवरुखकर यांजकडून व्दितीय पारितोषिक रोख रु 3333/- कै. पुरुषोत्तम शंकर देवरुखकर यांच्या स्मरणार्थ, श्री समीर मनोहर नगरकर यांजकडून प्रथम व व्दितीय पारितोषिक ट्रॉफीज कै. मनोहर धोंडू नगरकर, कै. मालती मनोहर नगरकर यांच्या स्मरणार्थ, श्री सुनील सदानंद सागवेकर यांजकडून उत्कृष्ट फलंदाज-गोलंदाज-मॅन ऑफ दि सिरीज ट्रॉफीज कै. सदानंद रा. सागवेकर, कै. सुनंदा स. सागवेकर, कै. संतोष स. सागवेकर यांच्या स्मरणार्थ, मनोहर ल. पालकर यांजकडून वरिष्ठ सामना प्रथम पारितोषिक- कै. सदानंद ल. पालकर यांच्या स्मरणार्थ, प्रभाग क्र 204 भारतीय जनता पार्टी श्री राजेशजी परळकर यांजकडून दोन दिवसासाठी सकाळचा नाश्ता आणि चहा तसेच श्री कृपाशंकर दुबे यांजकडून पाणी बॉटल, श्री नारायण गुरव-श्रीपाद वल्लभ ज्वेलर्स यांजकडून युवामंच टीमसाठी टीशर्ट देण्यात आल्या. तर देणगी स्वरुपात श्रीधर सागवेकर, सदानंद नगरकर, मोहन नगरकर, प्रकाश वाडेकर, निलेश सागवेकर, योगेश सागवेकर, विनोद पालकर, दीपक सागवेकर, रत्नावली चिखलकर, पांडुरंग वाडेकर, संतोष नगरकर, विलास नगरकर, नरेंद्र देवरुखकर, वि.सु.ज्ञा.स. गिरगाव मुंबई संस्था यांनी देणगी देऊन सहकार्य केले या सर्वांचे युवामंचकडून जाहीर आभार मानण्यात आले.
तसेच भ्झ्थ्2022 यशस्वी होण्यासाठी संघ नोंदणी होणे आवश्यक होते हे महत्वाचे काम परेल- आशिष पालकर, गिरगाव -चेतन देवरुखकर व विकास नगरकर, अंधेरी-अंबोली-प्रवीण नगरकर, दिवा डोंबिवली- संतोष देवरुखकर, जोगेश्वरी- गौरव वारणकर, नवीमुंबई- दिलीप देवरुखकर व सिद्धेश देवरुखकर, पोलादपूर- अमरदीप नगरकर, गोवंडी- मंगेश पालकर, कुर्ला-अजय आगवेकर, काळाचौकी- अमित पालकर, अंधरी-विलेपार्ले- रामचंद्र सागवेकर व नरेंद्र देवरुखकर, महाड-नडगाव- सुधीर नगरकर, मिरारोड ते डहाणू- पांडुरंग वाडेकर व रोहिदास नगरकर, पालगड- दापोली- गणेश सागवेकर, रत्नागिरी- अतुल देवरुखकर, मालाड- कांदिवली- ऋषीकेश सागवेकर या सर्वांनी अतिशय मेहनतीने पार पाडले या सर्वांचे युवामंचकडून जाहीर आभार मानण्यात आले.
यानंतर मान्यवरांना आपले मनोगत मांडण्यास विनंती केली. निलेश सागवेकर यांनी आज मला युथफेअर 2016 ची आठवण झाली. आज ज्या नियोजनपूर्व हे सामने खेळविण्यात येत आहेत ते कौतुकास्पद आहे. अशीच युवामंचने प्रगती करत रहावी. विजेत्या टीमचे अभिनंदन केले आणि संपूर्ण युवामंचला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. योगेश सागवेकर यांनी युवामंच गेली पंचवीस वर्ष काम करीत आहे, मागील कार्यकारिणीने जर मंदिर बांधले असेल तर आताची टीम त्यावर कळस रचून युवामंचची पताका अभिमानाने फडकवित आहेत. खरोखरच 17 संघ आज इथे खेळले, त्यांना सहभाग घेण्यास भाग पाडले यातच युवामंच विजयी झाला असे मला वाटते. विजेत्या टीमचे अभिनंदन केले आणि युवामंच टीमला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. मोहन नगरकर यांनी विजेत्या टीमचे व सहभागी संघांचे संस्थेतर्फे अभिनंदन व आभार मानले. आज युवामंचमुळे आम्हालाही खेळाचा आनंद लुटता आला. युवामंचच्या नियोजनाबद्दल विशेष आभार मानले. समाजबांधव राजेंद्र मारूती सागवेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, आज युवामंच जे काम करीत आहे त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांचे नावं नकळत मोठे होत आहेत. माझे भाऊ कै. दत्तात्रय सागवेकर यांचा मी विशेष आभारी आहे, गणेश हा माझा पुतण्या आहे आज जे काम त्याच्याकडून होत आहे हे सागवेकर कुटुंबियांसाठी अभिमानस्पद आहे. त्यावेळी गणेश दत्तात्रय सागवेकर यांना वडिलांच्या आठवणीमुळे अश्रू अनावर झाले. विजेत्या टीमचे अभिनंदन केले, संपूर्ण युवामंचला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सदानंद द. नगरकर यांनी आज युवामंच रौप्यमहोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवीत आहे याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. असेच कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबविले गेले पाहिजेत. यासाठी संस्था युवामंचच्या पाठीशी आहेच. खरोखर युवामंच जे कार्यक्रम राबवीत आहेत ते कौतुकास्पद आहेत यामुळे संस्थेच्या इतर अंगांना प्रेरणा मिळत आहे. सर्व अंगांनी असे कार्य केले तर संस्थेचे कार्य समाजात सर्वांना हेवा वाटेल असे होईल. विजेत्या टीमचे अभिनंदन केले. सहभागी संघांचे महासंघातर्फे आभार मानले व युवामंच टीमला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. गणेश सागवेकर यांनी 17 टीमचे युवामंच वतीने सहभागी झाल्याबद्दल आभार मानले. युवामंच प्रीमिअर लीग भ्झ्थ्2022 यासाठी सर्वात महत्वाचे संघ सहभागी होणे हे होते. जर आज संघ नसते आले तर भ्झ्थ्2022 यशस्वी होणे शक्य नव्हते असे मला वाटते. युवामंच कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मान्यवरांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले व भ्झ्थ्2022 साठी असेच सहकार्य मिळावे यासाठी आवाहन केले. वि. सु.स. मुंबई अध्यक्ष श्रीधर सागवेकर यांनी युवामंचच्या कामाचा जो यशस्वी प्रवास चालू आहे, 17 संघाना सहभागी करण्याचे मोठे काम त्यांनी पार पाडले यासाठी अभिनंदन केले. आज खेळाडू म्हणून जे आले आहेत त्यांनी समाजकार्यात सहभागी होऊन समाजाच्या विकासासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन केले. विजेत्या टीमचे अभिनंदन केले आणि युवामंचला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर युवामंच सेक्रेटरी अतुल देवरुखकर यांनी कार्यकर्त्याचे आभार मानले. अमित पालकर यांनी पोलिस परमिशन, ग्राउंड परमिशन तसेच सामने खेळविण्यासाठी विशेष योगदान दिले तर गणेश सागवेकर यांनी संघ येण्यासाठी विशेष प्रयत्न केले यासाठी अतुल देवरुखकर यांची उत्तम साथ त्यांना लाभली. मंगेश पालकर यांनी गोवंडी व कुर्ला संघ सहभागी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आशिष पालकर, ओमकार सागवेकर, शुभम सागवेकर, विलास सागवेकर, अजय आगवेकर, अमोल सागवेकर यांनी कार्यक्रमावेळी विशेष योगदान दिले. चेतन श्रीकृष्ण सोनार यांनी स्कोअर बोर्ड लिहिण्याची जबाबदारी उत्तम बजावली. तसेच संदीप वाडेकर यांच्या सहयोगाने सामन्यासाठी पंच लाभले. याबद्दल सर्वांचे आभार मानले. यानंतर विजेत्या संघास अध्यक्षांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी खेळाडूंचा जल्लोष अवर्णनीय होता आणि युवामंच कार्यकारिणीचा ऊर अभिमानाने भरून आला होता. युवामंचची हि घोडदौड रौप्यमहोत्सव सांगता सोहळ्यापर्यंत अशीच राहणार आहे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. अशा रितीने नियोजीत वेळेनुसार सायंकाळी 6 वा. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
युवामंच, मुंबई