Card image cap
समाजात एक प्रमुख मानला जाणारा विधी म्हणजे मौजीबंधन. गेली 2 वर्षे कोरोना महामारीमुळे समाजात अस्वस्थता पसरली होती. जेव्हा कोरोनाचे सावट थोडे कमी झाले तसे समाजबांधवांची मौजीबंधन कार्यक्रम कधी होणार अशी विचारणा सुरु झाली. जानेवारी 2022 पासून या चर्चेला उधाण आले होते तेव्हा वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दि.1 जून हा चांगला दिवस असल्यामुळे सामुदायिक मौजीबंधन आयोजित करण्यात आला. सोहळ्यात 56 बटूंचा सहभाग होता. बुधवार दिनांक 01 जून 2022 रोजी जेष्ठ शु. 2, शके 1944 या शुभदिनी मिनाकुमारी हॉल, जोगेश्वरी पश्चिम येथे वि.सु.स.मु. अध्यक्ष श्री. श्रीधर रा. सागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम स्थळी सकाळी 8:00 वाजल्यापासून कार्यकर्ते, बटू, पालक व नातलगांची लगबग चालू होती. सोहळा सुरू करण्यापूर्वी विश्वकर्मा महाराज व संतशिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन, दिपप्रज्वलन व पुष्पमाला अध्यक्ष श्री. श्रीधर रा. सागवेकर, उपाध्यक्ष सर्वश्री संजय स. देवरुखकर, उदय सागवेकर, सुनिल भा. सागवेकर, सरचिटणीस मोहन ह. नगरकर, सहचिटणीस राजू पंडित, वास्तूसमिती प्रमुख सदानंद द. नगरकर, कार्याध्यक्ष प्रकाश अ. वाडेकर, पतपेढी अध्यक्ष मनोहर ल. पालकर, सदस्य विलास (बाळा) गो. नगरकर इत्यादींच्या उपस्थितीत पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पूजन संपन्न झाले. मौजीबंधन कार्यक्रमास उपस्थित सर्व बटू, पालक, पाहूणे व कार्यकर्त्यांचे सरचिटणीस मोहन ह. नगरकर यांनी मनपूर्वक स्वागत करून संपूर्ण सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करुन पुढील सुत्रसंचालन उपाध्यक्ष उदय रामचंद्र सागवेकर यांना करण्यास पाचारण केले. उदय रामचंद्र सागवेकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून उत्तम निवेदन आणि मार्गदर्शन केले तसेच उपस्थित पाहूण्यांचे व समाजबांधवांचे स्वागत केले. सर्वांना सभागृहात बसण्याची विनंती करण्यात आली. बटूंना व पालकांना गोत्राप्रमाणे बसण्याची व्यवस्था करण्यात आली. पुरोहितांनी यजमानास विधी कशाप्रकारे करावयाच्या याचे मार्गदर्शन करीत होते. सर्व बटूंस महेश भटजी व त्यांच्या सहकारी पुरोहितांनी पारंपारिक पद्धतीने बटूंना मार्गदर्शन केले. गायत्री मंत्रोच्चार करण्यास सांगितले. सर्व विधी मंगलमय वातावरणात चालु होत्या. बटूंना जान्हवे (यज्ञोपवित) धारण करण्यास सांगण्यात आले. पुढे भिक्षुकी मागण्यासाठी सर्व बटूंनी समाजबांधवांकडे गेल्यावर प्रत्येकाने त्यांच्या परडीमध्ये योग्य ती भिक्षुकी दिली. नंतर सर्वांचे मगंलाष्टके म्हणून लग्न लावण्यात आले. बटूंना देवळात नेवून देवदर्शन घडविण्यात आले. सर्व विधी आटोपल्यानंतर प्रथम बटूंना भोजनास बसविण्यात आले. नंतर उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमास दापोली, मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पनवेलहून अनेक समाजबंधू-भगिनींची उपस्थिती लाभली होती. सर्वांनी बटूंना शुभाशिर्वाद दिले. हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली. कार्यक्रमादरम्यान बयाच समाज बांधवांनी मौजीबंधन सोहळ्यासाठी देणग्या दिल्या. त्यांचे संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देउन यथोचित सत्कार केला. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदिप गो. सागवेकर यांचे संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात मोलाचे सहकार्य असते. कार्यक्रमात संस्थेचे व महासंघाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ म. देवरुखकर, सल्लागार रघुनाथ गं. देवरुखकर, अनंत तु. सागवेकर, महिला संघटना सल्लागार सौ.वैशाली वि. करंजवकर, महिला संघटना उपाध्यक्षा श्रीमती अनिता प्र. सागवेकर, सचिव श्रीमती श्रद्धा सं. सागवेकर, दापोली संस्थेचे अध्यक्ष संदिप करंजवकर यांची विशेष उपस्थिती होती. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर आलेल्या बटूंची नोंद करणे, बटूंचे फॉर्म भरणे, वर्गणी व देणगी जमा करणे यासाठी उपाध्यक्ष सुनिल भा. सागवेकर, सहचिटणीस अशोक र. पालकर, राजेंद्र वा. पंडित, जोगेश्वरी विभाग प्रमुख अशोक का. नगरकर, सदानंद पां. सागवेकर, मंगेश र. पालकर युवामंच कार्याध्यक्ष यांनी विशेष कामगिरी पार पाडली. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री विनायक रा. सागवेकर, संतोष वि. देवरुखकर, प्रशांत अ. पालकर, दिपक र. सागवेकर, राजेश सि. सागवेकर, रमाकांत कृ. पालकर, रविंद्र म. विगरुळकर, युवामंच अध्यक्ष गणेश द. सागवेकर, सचिव अतुल रा. देवरुखकर, सहचिटणीस संकेत स. नगरकर, कार्याध्यक्ष प्रसाद चिखलकर इत्यादींचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास हॉल व कॅटरिंग व्यवस्थापनाने चांगल्याप्रकारे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. मौजीबंधन सोहळा पार पाडल्यास कार्यकर्ते व समाजबांधवांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.