Card image cap
विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संचालित ’युवामंच“ चे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु आहे. यानिमित्ताने ’युवामंच“ च्या मार्फत समाजासाठी आणि इतर सर्व नागरिकांसाठी ’सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि कॅन्सर निदान तपासणी शिबिर“ रविवार दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी विश्ववर्धिनी शिक्षण संस्था, मेघवाडी पोलिस स्टेशन समोर, मेघवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - 400 060 येथे इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई आणि नानावटी मॅक्स हॉस्पिटल, डॉ. पॉलोमी दास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास समाजबांधवांनी व इतर नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या आरोग्य तपासणी केली. सदर शिबीर तीन विभागासाठी घेण्यात आले. कॅन्सर तपासणी विभागासाठी इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई. चव्हाण साहेब आणि सुधाकर चौगुले साहेब, आरोग्याची तपासणी विभागासाठी नानावाटी मॅक्स हॉ स्पिटल वाघमारे साहेब आणि B.M.D. विभागासाठी डॉ. पॉलोमी दास (M.B.B.S., M.D. (General Medicine) K.E.M. Hospital) या सर्वांचे शिबिर राबविण्यास सहकार्य लाभले या सर्वांचे युवामंचकडून जाहीर आभार!
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन-प्रतिमापूजन करून करण्यात आली. यानंतर विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संस्थेचे अध्यक्ष श्रीधर रामचंद्र सागवेकर यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सदर शिबिरासाठी विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई अध्यक्ष श्रीधर रा. सागवेकर, सरचिटणीस मोहन ह. नगरकर, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार महासंघ सरचिटणीस सदानंद द. नगरकर, माजी अध्यक्ष व मार्गदर्शक जगन्नाथ म. देवरुखकर, माजी अध्यक्ष विलास वि. वाडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष उदय रा. सागवेकर, सहचिटणीस अशोक र. पालकर, सहचिटणीस राजेंद्र वा. पंडित, कार्याध्यक्ष सुनील स. सागवेकर, कार्याध्यक्ष सौ. वैशाली वि. करंजवकर, खजिनदार संतोष वि. देवरुखकर, सहखजिनदार प्रशांत अ. पालकर, शि.स.प्रमुख रामचंद्र सि. सागवेकर, सदस्य दीपक र. सागवेकर, महिला संघटना अध्यक्षा श्रीमती अनिता प्र. सागवेकर, युवामंच अध्यक्ष गणेश द.सागवेकर, सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर, सहचिटणीस संकेत स. नगरकर, कार्याध्यक्ष प्रसाद ग. चिखलकर व मंगेश रमेश पालकर, अमित म. पालकर, खजिनदार ओंमकार सु. सागवेकर व उपखजिनदार श्री आशिष अ. पालकर व अजय स. आगवेकर, युवामंच माजी अध्यक्ष निलेश बा. सागवेकर, मीरा रोड ते डहाणू विभागाचे सेक्रेटरी रोहिदास ह. नगरकर, माजी युवामंच कार्यकर्ता सुधीर रा. चिखलकर, तुषार देवरुखकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टी जोगेश्वरी विभागाचे अध्यक्ष बाळा लाड साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे युवामंचतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱयांनी आपले मनोगत मांडले, सदानंद द. नगरकर यांनी आज युवामंच रौप्यमहोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवीत आहे याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. असेच कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबविले गेले पाहिजेत. यासाठी संस्था युवामंचच्या पाठीशी आहेच. खरोखर युवामंच जे कार्यक्रम राबवीत आहेत ते कौतुकास्पद आहेत. यामुळे संस्थेच्या इतर अंगांना प्रेरणा मिळत आहे. सर्व अंगानी असे कार्य केले तर संस्थेचे कार्य समाजात सर्वांना हेवा वाटेल असे होईल. युवामंचचे अभिनंदन केले आणि संपूर्ण युवामंच टीमला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर जगन्नाथ म. देवरुखकर यांनी, आज संस्था आणि त्या अनुषंगाने युवामंच जे काम आज करीत आहे ते अभिमानास्पद आहे. युवामंचने याहीपुढे असेच उत्तमोत्तम कार्यक्रम राबवावेत. रौप्यमहोत्सवानिमित्त युवामंच टीमला शुभेच्छा दिल्या. यानंतर योगेश सागवेकर यांनी, युवामंच गेली 25 वर्ष काम करीत आहे, आणि आज रौप्यमहोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवीत आहे याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. आजची पिढी ज्या जोमाने काम करीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे आरोग्य शिबीर आपल्या समाजबांधवांसाठी नसून इतर नागरिकांसाठी सुद्धा आहे हे कौतुकास्पद आहे. युवामंच अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांचे विशेष अभिनंदन केले आणि संपूर्ण युवामंच टीमला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. उदय सागवेकर यांनी, प्रथम अशाप्रकारचे आरोग्य शिबीर राबविल्याबद्दल युवामंचचे अभिनंदन केले व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. युवामंच रौप्यमहोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवीत आहे. वृक्षारोपण, आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, भारताबाहेर शिक्षणाच्या संधी, महिलांसाठी विशेष-व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, चित्रकला व निबंध स्पर्धा हे कार्यक्रम राबविले आणि आज आरोग्य शिबीर हा समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत आहे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. असेच उतमोत्तम कार्यक्रम राबवावेत संस्थेचा त्यास पाठींबा असेलच. संतोष वि देवरुखकर यांनी, आज युवामंचमार्फत हे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे त्याचा आपल्या समाजबांधवानी लाभ घ्यावा. कोणत्याही आजाराचे निदान योग्यवेळी व्हावे यासाठी समाजबांधवानी अशा शिबिरांना उपस्थित राहायला पाहिजे. कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल युवामंचला टीमला शुभेच्छा दिल्या. विलास वि. वाडेकर यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल युवामंचला टीमला शुभेच्छा दिल्या. असेच उतमोत्तम कार्यक्रम राबवावेत आमचा त्यास पाठींबा असेल. राजेंद्र वा. पंडित यांनी, आज युवामंच रौप्यमहोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवीत आहे. हाहि कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल युवामंच टीमला शुभेच्छा दिल्या. सुनील सागवेकर सर यांनी, पुढील आठवड्यात दिवाळी आहे त्याची सुरुवात उत्तम आरोग्यासाठी धन्वंतरीची पूजा करून करतात त्याचप्रमाणे या शिबिराचे आयोजन केले आहे. समाज बांधवानी उत्तम आरोग्यासाठी या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल युवामंचला टीमला शुभेच्छा दिल्या. यानंतर युवामंच सेक्रेटरी अतुल देवरुखकर यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याबदद्ल उपस्थित सर्वांचे आभार मानले. पुढील नियोजित कार्यक्रमांना असेच सहकार्य मिळावे अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रम राबविण्यासाठी आर्थिक निधी आवश्यक असतो तेव्हा या उपक्रमाला योगेश ह. सागवेकर, महिला संघटना कार्यकारिणी, मोहन ह. नगरकर, सदानंद द. नगरकर, जगन्नाथ म. देवरुखकर, निलेश बा. सागवेकर, संतोष वि. देवरुखकर, विलास करंजवकर, रोहिदास ह. नगरकर, सुधीर रा. चिखलकर, दीपक र. सागवेकर, विलास वि.वाडेकर हे देणगीदार लाभले. त्यांचे युवामंचतर्फे जाहीर आभार!. तसेच संस्थेच्या विभाग प्रमुखांचे कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले विलास स. सागवेकर (विलेपार्ले), विलास रा. सागवेकर (विलेपार्ले), विलास (बाळा) नगरकर, संदीप नगरकर, नरेश देवरुखकर(अंधेरी), सदानंद सागवेकर, शेखर वारणकर, अशोक नगरकर, चंद्रकांत नगरकर(जोगेश्वरी), संतोष देवरुखकर(गोरेगाव), रमाकांत पालकर, रामभाऊ पालकर(मालाड) आणि महिला मंडळ कार्यकर्त्या सौ विभा गणेश सागवेकर यांनी रजिस्ट्रेशनसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी युवामंच टीमने विशेष प्रयत्न केले. यामध्ये बॅनर प्रिंटींग आणि हँगिंग शुभम सागवेकर आणि संकेत नगरकर यांनी महत्वाचे कार्य केले. योगेμा ह. सागवेकर यांनी कॅन्सर μाबिर मिळवून देण्यास सहकार्य केले. मंगेश रमेश पालकर यांनी नानावटी हॉस्पिटलशी संपर्क साधून आरोग्य तपासणी शिबीर मिळवून दिले. तसेच कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी युवामंच कार्याध्यक्ष प्रसाद चिखलकर आणि खजिनदार ओमकार सागवेकर यांनी विशेष प्रयत्न केले. युवामंच अध्यक्ष यांनी इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई, नानावटी मॅक्स हॉस्पिटल आणि डॉ. पॉलोमी दास यांचे आभार मानले. संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी युवामंच कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. युवामंचची ही घोडदौड रौप्यमहोत्सव सांगता सोहळ्यापर्यंत राहणार आहे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. अशा रितीने नियोजीत वेळेनुसार दुपारी 3ः30 वा. शिबीर संपविण्यात आले.
युवामंच, मुंबई