भविष्यातील कार्यभार सांभाळण्यासाठी व सामाजिक अडीअडचणी समजावून घेण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. यासाठी समाजातील तरुण-तरुणींना एकत्र करून आणि मार्गदर्शन करुन त्यांची एकजूट करण्यासाठी युवामंच प्रणेते श्री यशवंत शंकरशेठ सागवेकर साहेब (निवॅत्त पोलिस अधीक्षक) व श्री सुनील दत्ताराम देवरुखकर यांनी समाजाची उत्तरोत्तर वाटचाल चालू राहावी असा मनोदय क्यक्त केला तसेच समाजाच्या प्रगतीसाठी आणि बळकटीसाठी युवाशक्तीची नितांत गरज आहे, यासाठी त्यांनी समाजाचे अध्यक्ष कै. श्री. भार्गवशेठ शंकरशेठ सागवेकर, कै. श्री. मोतीराम ल. सागवेकर व श्री. जगन्नाथ महादेव देवरुखकर सरचिटणीस, श्री सदानंद दत्तात्रय नगरकर यांनी एकमताने युवामंचाची स्थापना 1996 साली करण्यात आली.
त्यासाठी प्रथम युवा मंच अध्यक्षपदी श्री. उदय रामचंद्र सागवेकर व सरचिटणीस पदी श्री. रविंद्र पांडुरंग वारणकर यांची नियुक्ती केली. या टीम मध्ये योगेश हरिश्चंद्र सागवेकर, श्री. सुनिल सदानंद सागवेकर, श्री. समर्थ सत्यवान पालकर, श्री. नितीन राजाराम देवरुखकर, सौ. रेश्मा सागवेकर, श्री. किरण देवरुखकर, श्री.सुधीर चिखलकर आणि श्री. समीर नगरकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे ऋण फेडणे व समाजाचे हित साधणे हे आपले कर्तक्य समजून तसेच समाजाच्या सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे हा उद्देश बाळगुन आपल्या कार्याला सुरुवात केली या युवामंच संघटनेने समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आणि त्याप्रमाणे शिरगणती, वित्त नियोजन, शैक्षणिक वेबसाईट बनवून कार्यक्रम यशस्वीरित्या करून दाखविले.
त्यानंतर नवीन तरुण-तरुणींना एक संधी देण्यासाठी व त्यांच्या कार्यकुशलतेला वाव देण्यासाठी पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांनी युवामंचचा कारभार नवीन युवा कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला त्यासाठी युवा मंच समिती प्रमुख श्री. समर्थ सत्यम पालकर तसेच अध्यक्षपदी श्री गणेश गंगाराम नगरकर, सरचिटणीस पदी कै. श्री प्रशांत देवळेकर आणि कार्याध्यक्षपदी श्री उदय नगरकर या कार्यकारणीची सन 2003 साली नियुक्ती करण्यात आली. यांनीही समाजाला प्रगतीकडे देण्याचे ध्येय अविरत चालू ठेवून उत्तम प्रकारे कामगिरी केली. महाराष्ट्रभर गाव ते शहरापर्यंत समाज जाग्रुती करण्याकरिता ठिकठिकाणी दौरे केले. या कार्यकारिणीने नवनवीन म्हणजेच रक्तदान व आरोग्य शिबीर शैक्षणिक मार्गदर्शन तसेच वित्त नियोजन यासारखे उपक्रम राबवून व तरुण वर्गाला एकित्रत करण्याचे मोलाचे योगदान दिले.
अशाप्रकारे युवामंचाची सोनेरी वाटचाल पुढे कायम चालू राहण्यासाठी युवामंचचे पुर्वाश्रमीचे कार्यकर्ते श्री उदय रामचंद्र सागवेकर, श्री रविंद्र पांडुरंग वारणकर आणि योगेश हरिश्चंद्र सागवेकर यांची नवीन युवामंचची कार्यकारणी निवडण्यासाठी समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर दिनांक 8 ऑगस्ट 2011 रोजी हंगामी कार्यकारिणी निवडण्यात आली. त्या सहा महिन्यांच्या यशस्वी कार्य काळानंतर पुढील तीन वर्षासाठी कायमस्वरूपी कार्यकारणी नेमण्यात आली. त्यासाठी अध्यक्षपदी श्री निलेश बाळकृष्ण सागवेकर, सरचिटणीस पदी श्री गणेश दत्तात्रय सागवेकर तसेच उपाध्यक्षपदी श्री प्रशांत अरविंद पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी अध्यक्ष म्हणून श्री निलेश बाळकृष्ण सागवेकर कसे खंबीर नेतृत्व लाभले व युवामंच एका वेगळ्या धैर्याने चिकाटीने काम करू लागला आणि उपक्रम यशस्वीरीत्या राबविले...
सन 2012 साली युवामंच कडून समाजातील पहिली दिनदर्शिका काढण्यात आली .समाजातील सुवर्णकारणांसाठी पहिले BID संस्थेमार्फत हॉलमार्किंग शिबिर घेण्यात आले. बहुतेक विभागात स्नेह मेळावे घेतले. मधील www.vssmumbai.com या समाजाच्या संकेतस्थळाला नवीन रंग रूप देण्यात आले. आजही ती दिमाखात कार्यरत असून या संकेतस्थळावर आपल्या समाजाचा इतिहास, समाजातील अंगांची माहिती, जुन्या आठवणी/क्षणचित्रे तसेच विश्वकर्मा पंचाल मासिक कधीही वाचता येतो. गोवंडी विभागातील कार्यकर्त्यांकडून समाजातील युवकांना बेसिक कंप्यूटर प्रशिक्षण देण्यात आले. समाजातील युवक-युवतींची विभाग जुळावे त्यासाठी www.vivah.vssmumbai.com या संकेतस्थळाची निर्मिती 2016 साली करण्यात आली. आज बहुतांश समाज बांधव याचा लाभ घेत आहेत. शैक्षणिक मदत म्हणून समाजातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून सहकार्य करण्यात आले. समाजातून याचे कौतुक करण्यात आले. 2015 ते 2016 हे वर्ष संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले या मध्ये युवामंचाला सहभागी होता आले हे युवामंच भाग्य थोर. या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले समाज बांधव व विभागातील नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवात युवामंचला संपूर्ण दिवस कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि तो कार्यक्रम म्हणजे “युथफेअर 2016“. यामध्ये युवामंच क्रिकेट प्रीमियर लीग, युवा मंच चर्चासत्र, महिलांसाठी होम मिनिस्टर, युवामंच टॅलेंट शो, सेविंगस आणि फायनान्शियल मॅनेजमेंट क्यख्यान, युवा म्युझिक कॉन्सर्ट, ICICI अकॅडमी फॉर स्किल सेमिनार घेण्यात आले.
आजही युवामंचाच्या माध्यमातून याबद्दल प्रमोशन केले जाते काही विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेतला होतो आज ते एका चांगल्या ठिकाणी काम करीत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पाहून सर्व समाज बांधव भारावून गेले असे कार्य चालू असताना 2019 ते 2022 या तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या यासाठी अध्यक्षपदी श्री गणेश सागवेकर तर सरचिटणीस पदी श्री अतुल रामचंद्र देवरुखकर असे नेतृत्व लाभले या कार्यकारणी सुद्धा युवामंचाचे कार्य असे जोमाने सुरु ठेवले या कार्यकारिणीला कोरोना काळात सामना करावा लागला तरी सुद्धाया काळात आपल्याला कोणते कार्यक्रम करता येतील याचा विचार करून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.
आज आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या उद्देशाने युवामंच आणि सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे दिनांक 23 जून 2019 रोजी आयोजित करण्यात आले. या समाज बांधव व विभागातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. दरवर्षीप्रमाणे दि. 5 व 6 ऑगस्ट 2019 रोजी BIS संस्थेमार्फत सुवर्णकारांसाठी हॉलमार्किंग शिबिर घेण्यात आले. आज समाजातील युवक युवती विविध क्षेत्रात आपले नाव मोठे करीत आहे याची दखल घेत या प्रेरणादायी कर्तुत्व म्हणून त्यांची मुलाखत घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. युवामंचाच्या वतीने आर्टिझन कार्ड व परिचय कार्ड बरोबर मेडिक्लेम योजना अशा सरकारी योजना राबवली गेली.
“आता कसं जगायचं (2020)” लॉकडाऊन परस्थितीचा एक क्यक्ती म्हणून सामना कसा करावा व मानसिक संतुलन कसे राखावे यावर ऑनलाइन सेमिनार आयोजित करण्यात आले. यासाठी समाजबांधवांना भरघोस प्रतिसाद लाभला. लॉकडाऊन परिस्थिती सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप 2020 उपक्रम राबवण्यात आला. लॉकडाऊन काळत संस्थेच्या समाजबांधवांना मदत उपक्रमत युवामंचतर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले. आनंद वाटुया, हास्य खुलवूया या संकल्पनेने युवामंचच्या वतीने टाटा कॅन्सर हॉस्पिटल परेल येथे कॅन्सर पीडित लहान मुलांना खेळणी वाटप करण्यात आले. पूरग्रस्त समाज बांधवांचा एक हात मदतीचा संस्थेच्या मदत उपक्रमात युवामंचतर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे युवामंच दिनदर्शिका काढतच आहे, दिनदर्शिकेचे मुखपृष्ठ हे आकर्षणाचे भाग झाले आहे. वर्ष 2017, 2018, 2019, 2020 व 2022 सालच्या मुखपृष्ठांनी सर्वांची मने जिंकली व मुखपृष्ठ प्रेरणादायी ठरली. श्री अतुल रा. देवरुखकर यांच्या संकल्पनेतून यांनी स्वत डिझाइन केली आहेत. 2022 हे दिनदर्शिकेचे अकरावे वर्ष आहे तसेच युवामंच कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दिनदर्शिकेमध्ये बदल केलेला आहे. युवामंच मुंबई आपल्या कामातून वेगळेपणा आणि नाविन्य दाखवत असतेच तेव्हा आहे ही दिनदर्शिका वेगळ्या डिझाइन स्वरूपात तयार करण्यात आली.
युवामंच या यशामध्ये प्रत्येक सदस्याच्या खारीचा वाटा आहे अशा समाज संस्थेला युवा कार्यकर्त्यांची गरज आहे. आज युवामंच विविध सामाजिक उद्दिष्टे समोर ठेवून काम करीत आहे. यामध्ये - सुवर्णकारांसाठी योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, रोजगार /नोकरी / क्यवसाय मार्गदर्शन, वित्त नियोजन, करिअर मार्गदर्शन / क्यक्तिमत्व विकास, आपत्कालीन सहकार्य योजना, संकेतस्थळ नवनिर्मिती अशाप्रकारे युवामंचची घोडदौड चालू आणि ती अशी पुढेही चालू राहील.
मुंबईसह महाराष्ट्रात समाज बांधवांना संघटित करण्यासाठी जिह्यांच्या संस्था स्थापन करण्यासाठी अनेक श्रेष्ठ कार्यकर्त्यानी रात्रंदिवस दौरे करून खूप कष्ट घेतले आहेत. त्यातील काही कार्यकर्त्यांना देवाज्ञा झाली आहे. आज कार्यकर्ते आपापल्या परीने सामाजिक बांधिलकीचा वारसा घेऊन काम करीत आहेत अनेक कार्यकर्ते वयाने शारिरीकदृष्ट्या थकलेले आहेत. तेक्हा आता जाणवू लागले की भविष्यातील कार्यभार सांभाळण्यासाठी व सामाजिक समस्या समजावून घेण्यासाठी तरुणांनी पुढे यायला पाहिजे. युवामंचाला 25 वर्षे पूर्ण झाली या 25 वर्षात विविध कार्यकर्ते लाभले त्यांचा अमूल्य योगदानामुळे युवामंचने यशस्वी उपक्रम राबवले. त्यांनी पुन्हा समाज उन्नतीसाठी आपले योगदान द्यायला पाहिजे त्यामुळे संस्था जोमाने काम करेल. युवामंच ही युवकांची संघटना गेली अनेक वर्षे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. सर्व युवकांना समाजकार्याची आवड आहे सर्व समाज बंधू भगिनींना विनंती करीत आहोत की समाजाचे भविष्य युवांच्या हातात आहे. त्यासाठी आपल्या मुलांना व मुलींना युवामंचचे कार्य करण्यासाठी युवामंचला बळकटी देण्यासाठी युवामंचमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे ही आपणा सर्वांना सामाजिक बांधिलकी आहे. आजपर्यंत समाजबांधवांनी जसे सहकार्य युवामंचला केले आहे तसेच यापुढेही मिळत राहो व युवामंचाची उद्दिष्टे सफल होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
युवामंच, मुंबई
vvs.yuva@gmail.com
www.vssmumbai.com
www.vivah.vssmumbai.com