Card image cap
विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संचालित “युवामंच“ सात उद्दिष्टे अंतर्गत “करिअर गाईडन्स आणि व्यक्तिमत्व विकास“ या उद्दिष्टानुसार इच्छुक विद्यार्थ्यांसाठी “भारताबाहेर शिक्षणाच्या संधी“ याबद्दल मोफत माहितीपर शिबीर शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी सर्व मुलांसाठी आयोजित करण्यात आले. “रिया स्टडी एब्रॉड“ संस्थेचे कार्यालय लीला बिझनेस पार्क,अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू), मुंबई-400059. येथे, “रिया स्टडी एब्रॉड“ संस्थेचे प्राध्यापक श्री वैभव डाबरे सर आणि छाया कदम मॅडम यांच्या मार्फत मार्गदर्शन दिले गेले. सदर शिबीरात विद्यार्थ्यांसाठी भारताबाहेर आपल्या स्किल नुसार कोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत, तेथे राहण्याची सोय, शिक्षणाबरोबर पार्ट टाइम जॉब तसेच एज्युकेशन लोन अशी सर्वांगीण माहिती सांगितली गेली. या शिबिरास नववी पासूनचे विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच इतर समाजातील विद्यार्थ्यांनी सुद्धा या शिबीरात सहभाग घेतला होता. “रिया स्टडी एब्रॉड“ या संस्थेकडून सदर शिबीर मिळविण्यासाठी युवामंच उपखजिनदार आशिष अ. पालकर यांनी प्रयत्न केले आणि शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच युवामंच अध्यक्ष गणेश द. सागवेकर, सहचिटणीस संकेत स. नगरकर, कार्याध्यक्ष मंगेश र. पालकर यांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सर्वाचे युवामंच कडून जाहीर आभार! सदर शिबिरास वि.सु.समाज, मुंबई संस्थेचे सरचिटणीस मोहन ह. नगरकर, कार्याध्यक्ष सुनील स. सागवेकर, वि.सु. सह. पतपेढी (मर्या.) चे उपाध्यक्ष योगेश ह. सागवेकर, युवामंच माजी अध्यक्ष निलेश बा. सागवेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच युवामंच अध्यक्ष गणेश द. सागवेकर, सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर, कार्यध्यक्ष मंगेश र. पालकर, उपखजिनदार आशिष अ. पालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात वि.सु. समाज मुंबई संस्थेचे माजी अध्यक्ष सदानंद द.नगरकर यांनी त्यांच्या खाजगी कामामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याची खंत व्यक्त केली आणि युवामंचचा हा नवीन उपक्रम यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी फोनवरून शुभेच्छा व्यक्त केल्या. युवामंच सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर यांनी उपस्थित मान्यवरांचे, विद्यार्थ्याचे स्वागत करून कार्यक्रमास सुरूवात केली. आज समाजातील विद्यार्थी उच्चशिक्षित होत आहेत हे अभिमानास्पद आहेच. याहीपुढे जाऊन प्रगती करावी हा उद्धेश ठेऊन युवामंचने हे शिबीर आयोजित केले आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना आशिष अ. पालकर यांनी दिली, “रिया स्टडी एब्रॉड“ महाराष्ट्रातील शैक्षणिक सल्लागार आहेत आज तब्बल 12 वर्षे हि संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी भारताबाहेर आपल्या स्किल नुसार कोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत तेथे राहण्याची सोय, शिक्षणाबरोबर पार्ट टाइम जॉब तसेच एज्युकेशन लोन अशी सर्वागीक माहिती “रिया स्टडी एब्रॉड“ मार्फत दिली जाते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी याचा योग्य फयदा घ्यावा व प्रश्न विचारावे असे आवाहन करून शिबिरास सुरुवात झाली.प्राध्यापक श्री वैभव डाबरे सर आणि छाया कदम मॅडम “रिया स्टडी एब्रॉड“च्या कार्यप्रणालीबद्दल डिजिटल प्रेझेन्टेशनद्वारे माहिती दिली. यामध्ये त्यांनी कोणते देश व युनिव्हर्सिटीझ कोणत्या शिक्षणासाठी अधिक चांगले आहेत, युनिव्हर्सिटीझ व कॉलेजना डॉक्युमेंट सबमिट कसे करावे, भारताबाहेर शिक्षणासाठी पैसे जास्त लागतात तेव्हा स्कॉलरशिप, एज्युकेशन लोन, फॉरेन एक्सचेंज कसे मिळवावे. विझा तसेच शैक्षणिक विझा कसा मिळवावा, भारताबाहेर शिक्षणासाठी राहण्याची सोय तसेच शिक्षणाबरोबर पार्ट टाइम जॉब कसा करता येऊ शकतो. अशा विविध विषयांची सखोल माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करियरनुसार प्रश्न विचारले त्याबद्दलही छाया कदम मॅडम यांनी सखोल माहिती दिली. तब्बल दीडतास हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरु होता. अशारीतीने विद्यार्थांनी या शिबिराचा पुरेपूर फायदा घेतला. यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत मांडले, संस्थेचे सरचिटणीस मोहन ह.नगरकर यांनी शिबीर उत्तमरीत्या संपन्न झाले, भारताबाहेर शिक्षण याबद्दलची सखोल माहिती दिल्याबद्दल “रिया स्टडी एब्रॉड“ चे आणि सदर शिबीर राबविल्याबद्दल युवामंचचे आभार मानले आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. युवामंच माजी अध्यक्ष निलेश बा. सागवेकर यांनी मागील आय.सी.आय.सी.आय. स्किल डेव्हलपप्मेंट असा कार्यक्रम आपण घेतला होता आणि विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला होता. तसेच आजही युवामंचने हे शिबीर घेतले आहे ते आजच्या युवकांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. मीही युवामंचचा एक भाग होतो याचा मला आज अभिमान वाटतो आहे. असेच उत्तमोत्तम कार्यक्रम युवामंचने राबवावेत, माझे सहकार्य नेहमीच राहील. युवामंचला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. पतपेढी उपाध्यक्ष योगेश ह. सागवेकर यांनी युवामंच आणि “रिया स्टडी एब्रॉड“ चे भरभरून कौतुक केले. मीही युवामंचबरोबर गेली पंचवीस वर्ष काम करत आहे. आज युवामंच काळानुरूप बदलत आहे हे या शिबिराच्या आयोजनातून दिसून येत आहे. आजच्या विद्यार्थ्यांना कोणत्या माहितीची आवश्यकता आहे याची योग्य माहिती घेत या शिबीराचे आयोजन केले आहे. उपस्थित विद्यार्थ्यांनी या माहितीचा योग्य वापर करत आपली व समाजाची प्रगती करायची आहे यासाठी शुभेच्छा दिल्या. युवामंच सरचिटणीस अतुल रा. देवरुखकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे, पालकांचे शिबिराला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांनी आज मिळालेली माहिती आपल्यापर्यंत न ठेवता ती आपल्या भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण तसेच ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना ती सांगावी. “रिया स्टडी एब्रॉ ड“ या संस्थेची माहिती द्यावी, असे आवाहन करत या संस्थेचे प्राध्यापक श्री वैभव डाबरे सर आणि छाया कदम मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यानंतर युवामंच अध्यक्ष गणेश द. सागवेकर यांनी अध्यक्षीय भाषणात या संस्थेचे व उपस्थित विद्यार्थांचे, पालकांचे शिबिराला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. आज आपण विद्यार्थी आहोत आपली स्वतची प्रगती आपण केलीच पाहिजे. त्याबरोबर आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावणे आवश्यक आहे. आपण आपल्या समाजाचे देणे लागतो याची जाणीव असणे आवश्यक आहे. युवामंचसुद्धा तुमच्या प्रगतीचे माध्यम होऊ शकतो. यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना युवामंचमध्ये सामील होण्यासाठी आवाहन केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. युवामंचला असे कार्यक्रम राबविण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. इच्छुक समाजबांधवांनी युवामंचला देणगी स्वरुपात मदत देऊन सहकार्य करावे. असेच सहकार्य आणि प्रेम मिळत राहो हि विश्वकर्मा चरणी प्रार्थना!
“रिया स्टडी एब्रॉड“ या संस्थेच्या अधिक माहितीसाठी आपण युवामंच उपखजिनदार श्री आशिष अशोक पालकर यांच्याशी संपर्क करू शकता.
(संपर्क क्र. 7718949830)
युवामंच, मुंबई
vss.yuva@gmail.com