भविष्यात कार्यभार सांभाळण्यासाठी व सामाजिक अडीअडचणी समजुन घेण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा यासाठी समाजातील तरुण तरुणींना एकत्र करून आणि मार्गदर्शन करून त्यांची एकजुट करण्यासाठी "युवामंच" ची १९९६ साली स्थापना करण्यात आली.
ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे ऋण फेडणे व समाजाचे हित साधणे हे आपले कर्तव्य समजुन तसेच समाजाचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय आहे, हा उद्देश बाळगुन आपल्या कार्याला सुरुवात केली, ती घोडदौड आजपर्यंत चालू आहे आणि राहणार.......
काळानुरूप कार्यकारिणी बदलत गेल्या प्रत्येक कार्यकारिणीने आपापल्या परिने समाजसेवेसाठी उल्लेखनीय योगदान दिले. याच कार्यकरिणीमध्ये दिनांक ०८ ऑगस्ट २०११ रोजी हंगामी कार्यकारिणी निवडण्यात आली. सहा महिन्यांच्या यशस्वी कार्यकाळानंतर पुढील तीन वर्षांसाठी कायमस्वरूपी कार्यकरिणी नेमण्यात आली. यासाठी अध्यक्ष म्हणुन श्री. निलेश बाळकृष्ण सागवेकर असे खंबीर नेतृत्व लाभले व युवामंच एका वेगळ्याच धैर्याने चिकाटीने काम करू लागला आणि उपक्रम यशस्वीपणे राबवु लागला आणि आजही त्याच जोमाने उपक्रम राबवत आहे. युवामंच ने आजवर राबवलेल्या उपक्रमाची यादी सांगायची झालीच तर.....
- सन २०१२ साली युवामंच कडुन समाजातील पहिली दिनदर्शिका काढण्यात आली आणि यशस्वीपणे सलग नवव्या वर्षी युवामंच सोनेरी पाउल दिनदर्शिका २०२० घेऊन येणार आहे.
- समाजातील सुवर्णकारासाठी पहिले BIS संस्थेमार्फत हॉलमार्किंग शिबिर मोफत घेण्यात आले. यात २५ सुवर्णकारांनी भाग घेऊन हॉलमार्किंग प्रशस्तीपत्रक मिळविले.
- समाजबांधवांना एकत्र आणण्याचा उद्देशाने परेल, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, गोवंडी अश्या बहुतेक विभागात स्नेहमेळावे घेण्यात आले.
- सन २०१२ मध्ये www.vssmumbai.com या समाजाच्या संकेतस्थळाला नवीन रंगरूप देण्यात आले, आजही ती दिमाखात कार्यरत असुन संकेतस्थळावर आपल्या समाजाचा इतिहास, समाजातील अंगाची माहिती, जुन्या आठवणी/क्षणचित्रे तसेच विश्वकर्मा पंचाल मासिक कधीही वाचता येतो.
- गोवंडी विभागातील कार्यकर्त्यांकडुन समाजातील युवकांना "बेसिक कम्प्युटर प्रशिक्षण" देण्यात आले.
- समाजातील युवक युवतीची विवाह जुळावेत यासाठी www.vivah.vssmumbai.com या संकेतस्थळाची निर्मिती २०१६ साली करण्यात आली. आज बहुतांश समाजबांधव याचा लाभ घेत आहेत.
- शैक्षणिक मदत म्हणून समाजातील शालेय विद्यार्थ्याना मोफत वह्या वाटप करून सहकार्य करण्यात आले. समजातून याचे कौतुक करण्यात आले.
- युवामंच कार्यकर्त्यांमध्ये एकजूट होण्यासाठी दरवर्षी सामूहिक सहल काढली जाते. हीच एकजूट उपक्रमामध्ये उपयोगी पडते.
- २०१५ ते २०१६ हे वर्ष संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले, यात युवामंच ला सहभागी होता आले हे आमचे भाग्य थोर. याच सुवर्णमहोत्सवानिमित्ताने “ मोफत आरोग्य तपासणी शिबीर” आयोजित केले. समाज बांधव व विभागातील नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.
- विशेष म्हणजे संस्थेच्या सुवर्णमहोत्सवात युवामंचला संपूर्ण दिवस कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि तो कार्यक्रम म्हणजे "युथफेअर २०१६". या युथफेअर मध्ये…
- युवामंच क्रिकेट प्रीमियर लीग
- युवामंच चर्चासत्र
- महिलांसाठी होम मिनिस्टर
- युवामंच टॅलेंट शो
- सेविंगस आणि फायनान्शियल मॅनेजमेंट व्यख्यान
- युवा music concert
- ICICI Academy for skills कडून मार्गदर्शन सेमिनार घेण्यात आले. आजही युवामंचच्या माध्यमातून याबद्दल प्रमोशन केले जाते काही विध्यार्थ्यानी या कोर्सेस चा लाभ घेतला व ते आज एका चांगल्या ठिकाणी काम करीत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पाहुन सर्व समाजबांधव भारावून गेले.
- प्रतिवर्षाप्रमाणे युवामंच दिनदर्शिका काढतच आहे, आता त्याचे मुखपृष्ठ हे आकर्षणाचे भाग झाले आहे, वर्ष २०१७, २०१८ व २०१९ सालच्या मुखपृष्ठनी सर्वांची मने जिंकली व मुखपृष्ठे प्रेरणादायी ठरली.
- अशी घोडदौड चालू असताना २०१९ ते २०२२ या तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
- आज आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे याच उद्देशाने युवामंचाने सर्वासाठी मोफत आरोग्य शिबीर तपासणी व कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे दि. २३ जून २०१९ रोजी आयोजित करण्यात आले. यास समाजबांधव व विभागातील नागरिकांचा भरगोस प्रतिसाद लाभला.
- दरवर्षीप्रमाणे दि.५ व ६ ऑगस्ट २०१९ रोजी BIS संस्थेमार्फत सुवर्णकारासाठी हॉलमार्किंग शिबिर घेण्यात आले.
- आज समाजातील युवक युवती विविध क्षेत्रात आपले नाव मोठे करित आहेत याची दखल घेत "युवा प्रेरणादायी कर्तृत्व" म्हणून त्यांची मुलाखत घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, यापुढेही असे सत्कार चालू राहतील.....
- आपण सुवर्णकार आहोत मग सुवर्णकारांच्या हितासाठी काहीतरी केले पाहिजे, आज युवामंचच्या वतीने आर्टिसन कार्ड व परिचय कार्ड बरोबर मेडिक्लेम योजना अशा सरकारी योजना राबविल्या जात आहे
अशा प्रकारे युवामंचची घोडदौड चालू आहे आणि ती अशीच पुढेही चालु राहील........
आज युवामंच विविध सामाजिक उद्दिष्टे समोर ठेवून काम करीत आहे यामध्ये -
- सुवर्णकारासाठी योजना
- शैक्षणिक मार्गदर्शन
- रोजगार / नोकरी / व्यवसाय मार्गदर्शन
- वित्त नियोजन
- करिअर मार्गदर्शन / व्यक्तिमत्त्व विकास
- आपत्कालीन सहकार्य योजना
- संकेतस्थळ नवनिर्मिती
अशी उद्दिष्टे ठेऊन "युवामंच" कार्य करीत राहणार आहे. युवामंचच्या या यशामध्ये प्रत्येक सदस्याचा खारीचा वाटा आहे, आजपर्यंत समाजबांधवांनी जसे सहकार्य युवामंचला केले आहे तसे यापुढेही मिळत राहो व युवामंचची उद्दिष्टे सफल होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना...