Card image cap
विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई संस्थेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, 2 रा मजला, अग्निμामन दलाच्या मागे, दादर (पूर्व), मुंबई- 400014 येथे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री श्रीधर सागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री प्रमोद पांडुरंग नगरकर, विश्वकर्मा पंचाल मासिकाचे संपादक श्री सुनील दत्ताराम देवरुखकर, संस्थेचे माजी अध्यक्ष श्री विलास विठोबा वाडेकर, मार्गदर्शक श्री. सदानंद द. नगरकर, उपाध्यक्ष श्री. संजय स. देवरुखकर, श्री. उदय रा. सागवेकर, कार्याध्यक्ष श्री प्रकाश अ. वाडेकर, सौ वैशाली वि. करंजवकर महिला संघटना कार्याध्यक्षा, पतपेढी अध्यक्ष श्री. मनोहर लक्ष्मण पालकर, श्रीमती. अनिता प्रमोद सागवेकर महिला संघटना अध्यक्ष, संस्थेचे सल्लागार श्री अनंत तु. सागवेकर, दिवा- कसारा संलग्न संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मिलींद द. करंजवकर, मीरारोड ते डहाणू रोड विभागाचे सरचिटणीस श्री. रोहिदास ह. नगरकर, युवामंच अध्यक्ष श्री. गणेश दत्तात्रय सागवेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला. उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, पालक, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर प्रमुख पाहुणे यांचे कार्यक्रमासाठी सरचिटणीसांनी मनपूर्वक स्वागत केले. कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी गेल्या दोन वर्षात समाजातील ज्ञात अज्ञात व विशेष करून संस्थेचे माजी उपाध्यक्ष कै. शांताराम के. पालकर चांदीवली, कै. यशवंत शांताराम नगरकर ठाणे, माजी अध्यक्ष कै. रामचंद्र वारणकर भांडुप संस्थेचे जनसंपर्क प्रमुख व विश्वकर्मा पंचाल मासिकाचे मुख्य संपादक कै. जयवंत रा. देवरूखकर गोरेगाव, सदस्य कै. महादेव ग. वारणकर वरळी, कै गजानन द. देवरुखकर चेंबूर, महिला संघटना अध्यक्ष कै.श्रीमती अश्विनी अरुण नगरकर कुर्ला, संस्थेचे कार्यकर्ते श्री संजय कृ देवरूखकर, घणसोली यांच्या पत्नी कै. सौ वंदना संजय देवरुखकर (अध्यक्ष नवी मुंबई महिला संघटना) इत्यादींना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोहळ्याच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथम श्री गणेश व सुवर्णकारांचे आराध्य दैवत श्री विश्वकर्मा महाराज, श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज व सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन, पुष्पहार अर्पण केले व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सौ भाग्यश्री पालकर – पावस्कर हिने ईशस्तवन व स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय सरचिटणीस श्री. मोहन ह. नगरकर यांनी करून दिला. पाहुण्यांचा व सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह अध्यक्षांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. प्रमोद नगरकर व सुनिल देवरुखकर यांना देण्यात येणाऱया सन्मान पत्राचे वाचन कार्याध्यक्ष श्री. विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई शैक्षणिक पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संचालित ’युवामंच“ ’ रौप्यमहोत्सव 2022“ महिलांसाठी विशेष - व्यवसाय मार्गदर्शन शिबीर संपन्न विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई संचालित “युवामंच“ “ रौप्यमहोत्सव 2022“ निमित्ताने युवामंच आणि महिला संघटना सयुक्त विद्यमाने दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी महिलांसाठी विशेष-व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. “आराना सोल्युशन प्रा. लि. उद्योजक निर्मिती केंद्र“ चे डिरेक्टर श्री सुदेश देसाई सर व अमृता महाजनी मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीधर रा. सागवेकर, वि.पं.सु.महासंघ चे सरचिटणीस श्री सदानंद द. नगरकर, वि.सु.स.पतपेढीचे अध्यक्ष श्री मनोहर ल. पालकर, संस्थेचे माजीअध्यक्ष श्री विलास वि. वाडेकर आणि उपस्थित पदाधिकारी, युवामंच पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला. एकूण 80 समाजबांधवानी या शिबीराचा लाभ घेतला. अधिक माहिती पुढील वृत्तपत्रात देण्यात येईल. सुनिल सागवेकर यांनी केले. उपाध्यक्ष उदय सागवेकर यांनी कोविड योद्धा श्री. डॉ. प्रमोद नगरकर, श्री. संतोष विठ्ठल देवरुखकर, श्री. सुनिल भार्गव सागवेकर, श्री. राजेंद्र वासुदेव पंडित, श्री.सुनिल सदानंद सागवेकर, श्री. मंगेश नारायण करंजवकर यांच्याबद्दल माहिती देऊन त्या सर्वांचे शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच श्री. संतोष पांडुरंग नगरकर यांना पोलीस उपनिरिक्षक पदोन्न्ती बद्दल विशेष गौरव करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना डॉक्टर प्रमोद नगरकर यांनी म्हणटले की, आपल्या संस्थेचा गेले कित्येक वर्ष विकास पाहतो आहे तेव्हापासून मी आतापर्यंत संस्था प्रचंड फोफावली आहे. तिचे विकेंद्रीकरण झाले आहे. युवामंचने वेगवेगळे अभिनव कार्यक्रम सादर केले आहेत. महिलांसाठीही विशेष उद्योग मार्गदर्शन शिबिर राबवणार आहेत. आपल्या समाजामध्ये एम.बी.बी.एस डॉक्टरांची कमी आहे त्यासाठी आपल्या मुलांनी जास्तीत जास्त शिकवून एम.बी.बी.एस डॉक्टर व्हायला हवे त्यासाठी त्यांना मी लागेल ती मदत करण्यासाठी तयार आहे मुलांनी स्वत स्वतशी स्पर्धा करून पुढे यायला हवे. आपल्या समाजाने माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तसेच पुढे श्री सुनील देवरुखकर यांनी आपल्या मनोगत सांगताना असे सांगितले की गेली 27 वर्षे अनेक परिवर्तने पाहिली आपले मुखपत्र असावे असे मनोमन वाटत होते. संस्थेच्या 1994 साली झालेल्या प्रथम अधिवेशनामध्ये त्यासंबंधी सुतोवाच झाले. त्या वेळेचे अध्यक्ष कै. भार्गवशेठ सागवेकर यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि त्यासाठी आपले सध्या रत्नागिरीस्थित श्री. शांताराम भाऊ सागवेकर यांनी मला भरपूर मोलाची साथ दिली. त्याआधीही मी दैनिक सागर, लोकसत्ता, नवशक्ती आणि नवाकाळ अशा पेपरमध्ये काही वृत्तपत्र लेखन करत होतो. जेव्हा आपल्या समाजाचे विश्वकर्मा पंचाल मासिक सुरू करण्याची वेळ आली तेव्हापासून आतापर्यंत व्यवस्थित काम चालले आहे. सध्या माझ्या काही वैयक्तिक कामांमुळे लक्ष द्यायला मिळत नाही. त्यासाठी आता अतुल देवरुखकर, सुनील सागवेकर, मोहन नगरकर हे मासिकाची धुरा सांभाळत आहेत त्यांच्यासाठी मी बाहेरून माझ्याकडून होईल तेवढी मदत करत आहे यापुढे ही मदत लागेल ती मी करण्यास तयार आहे असे म्हणाले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सरचिटणीसानी संस्थेच्या कारभाराविषयी थोडक्यात माहिती दिली. संस्थेच्या मागील μाक्षणसमितीतर्पे गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि समर्थ क्लासेसचे समर्थ पालकर यांच्याकडून क्लास बॅगा दिल्या आहेत. त्यातही युवामंच कार्यकर्त्यांनी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळे अभिनव कार्यक्रम राबविले. कर्जत भिवपुरी येथे वृक्षारोपण व आदिवासी पाड्यातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना वह्या वाटप केले. बाहेरगावी जाऊन उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. यापुढेही महिला संघटनेसह उद्योजक निर्मिती केंद्रामार्फत महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याआधी उपस्थितांची करमणूक व्हावी म्हणून आपल्या समाजातील होतकरू गायक व प्रसिद्ध गायिका सौ.भाग्यश्री पालकर पावस्कर यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यांना टिटवाळ्याचे श्री सुनील महादेव वारणकर यांनी हार्मोनियमवर साथ दिली. दापोलीचा कुमार श्रेयस सागवेकर (युवामंच सरचिटणीस श्री अतुल देवरूखकर यांचा भाचा) कुमार धैर्य व तनिष्क हे दोघे कार्याध्यक्ष श्री सुनील सदानंद सागवेकर यांचे सुपुत्र यांनीही तबला वादन आणि देशभक्तीपर गीते गाऊन सर्वांचे मन मोहून टाकले. त्याचबरोबर युवामंच सहचिटणीस संकेत नगरकर यांनीही उत्तम गीते गायली.सौ. वैशाली सुनील सागवेकर, अतुल देवरुखकर यांनी सुरेल साथ दिली. व्हायलीनवर कुणाल सागवेकर यांनी ’ही चाल तुरुतुरु“ वेगळ्या ढंगात सादर केले.सुनिल सागवेकर सर यांनी स्वतच्या छंदासाठी हार्मोनियम, ढोलकी, तबला, घुंगरूकाठी या वस्तू या कार्यक्रमासाठी आणल्या होत्या.संस्थेने हा कार्यक्रम करण्यास अनुमती दिल्याबद्दल सर्व कलाकारांतर्फे आभार मानले. त्यानंतर मुख्य कार्यक्रम बक्षिस समारंभाचे शिक्षण समिती उपप्रमुख श्री.समर्थ स. पालकर यांनी पहिली से पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत करून मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास ज्या ज्या देणगीदारांनी सढळ हस्ते देणगी देवून सहकार्य केले. त्यांचे आभार मानण्यात आले. संस्थेचे कार्यकारी मंडळ, महिला संघटना, पदाधिकारी, युवामंचचे कार्यकर्ते आणि सर्व उपस्थितांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात सहकार्य केले. याबद्दल संस्थेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई संस्थेच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास श्री अनंत सागवेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. संजय देवरुखकर, व जतिन पोतदार (कोल्हापूर) यांनीही शुभेच्छा दिल्या. शेवटी सरचिटणीस श्री.मोहन ह. नगरकर यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.